scorecardresearch

कडाक्याच्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी आजच घरी आणा हा पोर्टेबल AC; पंख्याच्या किमतीमध्ये देईल थंड हवा

तुम्हालाही गरमीच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर बाजारात असे अनेक पोर्टेबल एसी आहेत, जे तुमचे काम सोपे करतील.

portable ac
यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत किंवा इन्स्टॉलेशनबद्दल काळजी करावी लागणार नाही. (Photo : Amazon)

भारतात उन्हाळा आला आहे. उन्हाचा सामना करण्यासाठी सर्वांनीच तयारी सुरू केली आहे. उन्हाळा आला की लोक पंखे, कुलर आणि एसीची सर्व्हिसिंग सुरू करतात किंवा पंखे, कुलर आणि एसी बदलतात. तुम्हालाही या समस्येपासून सुटका मिळवायची असेल तर बाजारात असे अनेक पोर्टेबल एसी आहेत, जे तुमचे काम सोपे करतील.

तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागणार नाहीत किंवा इन्स्टॉलेशनबद्दल काळजी करावी लागणार नाही. आज आपण अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध असलेल्या अशाच एका एअर कंडिशनरबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा आकार बॉक्ससारखा आहे आणि तुम्ही ते कुठेही नेऊ शकता.

ट्विटरची सुरुवात झाली तेव्हा पहिलं ट्विट काय होतं माहित आहे? वाचा…

हे एक कमी किमतीचे टेबल एसी आहे. तुम्ही ते कुठेही ठेवू शकता. ऑफिसचे काम करताना टेबलावर किंवा झोपताना बेडजवळ. हे यूएसबी केबलद्वारे चालवले जाऊ शकते. तुम्ही हा पोर्टेबल एसी कमी, मध्यम किंवा उच्च क्षमतेवरवर चालवू शकता. हे पोर्टेबल एसी ह्युमिडिफायर आणि प्युरिफायर म्हणूनही काम करते.

याची कूलिंग रेंज खूप उत्कृष्ट आहे. हे खोलीत कुठेही बसवा, ते काही मिनिटांत संपूर्ण खोली थंड करते. याचा आकारही खूप लहान आहे. जर तुमच्या घरात जास्त जागा नसेल तर हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे एसी बाजारात सहज उपलब्ध आहेत. जर तुम्हाला हे उत्पादन ऑनलाइन खरेदी करायचे असेल, तर ते अ‍ॅमेझॉनवरही खरेदी करता येईल. अनेक कंपन्यांनी हा पोर्टेबल एसी लॉन्च केला आहे. हा एसी तुम्हाला ८०० ते १५०० रुपयांमध्ये मिळेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bring home this portable ac today to get rid of the scorching heat in the price of the fan will give cool air pvp

ताज्या बातम्या