देशातील सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेडने खासगी मोबाइल सेवा कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी ३६५ दिवसांची योजना सादर केली आहे. प्रीपेड यूजर्स बीएसएनएलचा हा प्लॅन फक्त ७९७ रुपयांना तुम्ही खरेदी करू शकतात. बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये डेटा, एसएमएस आणि कॉलिंगची सुविधा ३६५ दिवसांसाठी मिळणार नाही, पण हा नंबर ३६५ दिवसांसाठी अॅक्टिव्ह असेल. BSNL च्या या प्लॅनची ​​सर्व माहिती जाणून घेऊया.

बीएसएनएलच्या प्लॅनमध्ये ही सुविधा उपलब्ध

बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला ६० दिवसांसाठी दररोज २जिबी डेटा मिळेल. यासोबतच दररोज १०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधाही मिळणार आहे. त्याच वेळी, २ जिबी डेटा संपल्यानंतर, इंटरनेटचा वेग ८० kbps होईल. त्याच वेळी बीएसएनएलच्या या प्लॅनमध्ये, तुम्हाला ३६५ दिवसांसाठी इनकमिंग कॉलची सुविधा असेल.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
धूळ नियंत्रण वाहनांमुळे नागरिकांबरोबरच झाडांचाही मोकळा श्वास
Loksatta viva Services and travel Volunteer Tourism Tourism
सफरनामा: सेवा आणि प्रवास!
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

या तारखेपर्यंत रिचार्ज केल्यास हा लाभ मिळेल

१२ जून २०२२ पर्यंत BSNL च्या या प्लॅनचे रिचार्ज करणाऱ्या ग्राहकांना 30 दिवसांची अधिक वैधता मिळेल. याचा अर्थ १२ जूनपर्यंत रिचार्ज करणाऱ्यांना ३६५ दिवसांसाठी या प्लॅनचा लाभ घेता येईल.

बीएसएनएलचे हे प्लॅन देखील आहेत उपलब्ध

बीएसएनएलच्या ६९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज ०.५ जिबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि १०० एसएमएस उपलब्ध आहेत. यासोबतच ९९९ रुपयांचा प्लॅन २४० दिवसांच्या वैधतेसह येतो आणि १४९९ रुपयांच्या पॅकमध्ये २४ जिबी डेटा तसेच २५० कॉलिंग मिनिटे आणि १०० एसएमएस प्रतिदिन मिळतील.

याशिवाय १९९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये २ जिबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि दररोज १००मोफत एसएमएस दिले जातात. तसेच Sony Liv चे सबस्क्रिप्शन देखील एका वर्षासाठी उपलब्ध असणार आहे.