भारत संचार निगम लिमिटेड ही एक सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. बीएसएनएल कंपनी आपल्या ग्राहकांसाठी अनेक ओटीटी सबस्क्रिप्शन प्लॅन्स ऑफर करत आहे, जे तुम्हाला फायबर ब्रॉडबँड सेवेच्या माध्यमातून अ‍ॅड-ऑन स्वरूपात खरेदी करता येऊ शकतात. बीएसएनएलने आपल्या वेबसाइटवर केलेल्या उल्लेखानुसार, ग्राहक २४९ रुपयांचा महिन्याच्या प्लॅन घेऊन आपल्या ब्रॉडबँड कनेक्शनसह अ‍ॅड-ऑन ओटीटी पॅक खरेदी करू शकतात. या सेगमेंटमध्ये असेही प्लॅन्स आहेत ज्याची किंमती यापेक्षा कमी आहे. प्लॅनची किंमत जितकी कमी असेल तितकीच त्यात मिळणारे मर्यादित स्वरूपाचे असतील हे लक्षात घेणे आवश्यक आहे. आज आपण अशा तीन प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.

BSNL सिनेमा प्लस ओटीटी प्लॅन्स

बीएसएनएलकडे तीन सिनेमा प्लस प्लॅन आहेत जे वापरकर्ते खरेदी करू शकतात. या प्लॅन्सची किंमत ४९ रुपये, १९९ रुपये आणि २४९ रुपये आहे. या यादीमधील सर्वात स्वस्त प्लॅन हा ४९ रुपयांचा आहे. यामध्ये वापरकर्त्यांना Lionsgate, शेमारूमी, हंगामा आणि एपिकॅान या ओटीटी प्लॅटफॉर्मचा फायदा मिळतो. याबाबतचे वृत्त telecomtalk ने दिले आहे.

हेही वाचा : Reliance Jio ची ग्राहकांना दिवाळीनिमित्त मोठी भेट! ३ हजांरापेक्षाही कमी दरात सादर केला नवीन 4G फोन, किंमत फक्त…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बीएसएनएलकडे असणाऱ्या दुसऱ्या प्लॅनची किंमत १९९ रुपये आहे. या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना झी ५, सोनी लिव्ह, YuppTV आणि डिस्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळतात. यादीतील शेवटचा प्लॅन हा प्रीमियम प्लॅन आहे.बीएसएनएलच्या २४९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनमध्ये वापरकर्त्यांना झी ५ प्रीमियम, सोनी लिव्ह, YuppTV, शेमारू, हंगामा, Lionsgate आणि डिस्नी+ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मचे फायदे मिळणार आहेत.

ग्राहकांनी जर का फायबर कनेक्शन खरेदी केले असेल तरच बीएसएनएलचे सिनेमा प्लस प्लॅन फायदेशीर ठरू शकतात. वर पाहिलेले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन तुम्हाला केवळ फायबर कनेक्शनच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर सक्रिय करता येणार आहे.