खासगी दूरसंचार कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया एकापेक्षा आकर्षक योजना लाँच करत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सुविधा देखील देत आहेत. असं असलं तरी डेटा आणि वैधतेच्या बाबतीत सरकारी कंपनी असलेल्या बीएसएनएलशी स्पर्धा करणे खूप कठीण आहे. जर तुम्ही बीएसएनएलचे ग्राहक असाल आणि स्वस्त प्रीपेड प्लान शोधत असाल तर अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बीएसएनएलमद्ये तुम्हाला ४९९ रुपयांपेक्षा कमी किंमतीत प्लान उपलब्ध असून तीन महिन्यांपर्यंतची वैधता देतात. जाणून घेऊयात या प्लानबद्दल

३९९ रुपयांचा प्लान
पहिला प्लान ३९९ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये ८० दिवसांची वैधता देण्यात आली आहे. प्लानमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज १ जीबी डेटासह १०० एसएमएस प्रतिदिन मिळतात. हा प्लान बीएसएनएल ट्यून आणि लोकधुन कॉन्टेंटचा अॅक्सेस देखील देतो.

४२९ रुपयांचा प्लान
दुसरा प्लान ४२९ रुपयांचा आहे. यामध्ये तुम्हाला फक्त १ दिवसाची अतिरिक्त वैधता मिळेल. ८१ दिवसांच्या प्लानमध्ये दररोज १ जीबी डेटा, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस मिळतात. विशेष बाब म्हणजे यामध्ये तुम्हाला इरॉस नाऊ मनोरंजन सेवेत मोफत प्रवेश दिला जातो.

४४७ रुपयांचा प्लान
तिसरा प्लान ४४७ रुपयांचा आहे. या प्लानमध्ये तुम्हाला १०० जीबी हाय-स्पीड डेटा दिला जाईल. प्लानची ​​वैधता ६० दिवसांची असेल. विशेष बाब म्हणजे डेटा वापरण्यासाठी रोजची मर्यादा नाही. या प्लानमध्ये तुम्हाला अमर्यादित व्हॉइस कॉल्स, १०० एसएमएस प्रतिदिन बीएसएनएल ट्यून्स आणि इरॉस नाऊ मनोरंजन सेवेची मोफत सदस्यता देखील मिळते.

जिओ धमाका! ३० दिवसांचा स्वस्त प्लान लाँच, दिवसाला मिळणार १.५ जीबी डेटा

४९९ रुपयांचा प्लान
चौथा प्लान ४९९ रुपयांचा आहे. हा प्लान पूर्ण ३ महिने म्हणजेच ९० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये दररोज २ जीबीचा हायस्पीड डेटा मिळतो. अशा प्रकारे तुम्हाला एकूण १८० जीबी डेटा मिळेल. यामध्ये दररोज अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि १०० एसएमएस दिले जातात. मात्र, ओटीटी सबस्क्रिप्शन दिलेले नाही.