Budget 2022: १ फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ होणार आहे. यावेळीही ते पेपरलेस असेल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन या यंदाचा अर्थसंकल्प संसद भवनात मांडतील. अर्थसंकल्प सामान्य असो की विशेष, याचा परिणाम सर्वांनाच होतो. अशा परिस्थितीत केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित प्रत्येक छोटी-मोठी माहिती तुम्ही मोबाईल अ‍ॅपवर मिळवू शकता.

‘Union Budget Mobile App’ असं या अ‍ॅपचं नाव आहे. हे गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर वरून सहजपणे डाउनलोड केलं जाऊ शकतं. पण ते Android 5.0 किंवा त्यावरील वर्जनसाठी आहे, तर iOS 10 किंवा पुढच्या वर्जनला सपोर्ट करतं.

संपूर्ण भाषण आणि त्यातील ठळक मुद्दे बजेटच्या एकामागून एक अपडेट्ससह अ‍ॅपवर उपलब्ध असतील. याशिवाय, तुम्ही त्याची PDF कॉपी देखील डाउनलोड करू शकता. वास्तविक, हे ऍप्लिकेशन संसद सदस्य आणि सामान्य लोकांसाठी बजेट दस्तऐवज सहज उपलब्ध व्हावे यासाठी आणले होते.

हे अ‍ॅप खास का आहे?:
या मोबाइल अ‍ॅपच्या मदतीने, केंद्रीय अर्थसंकल्पाशी संबंधित १४ कागदपत्रे पाहता येतील, ज्यात वार्षिक वित्तीय विवरण (AFS), अनुदानाच्या मागण्या (DG) आणि वित्त विधेयक इ. सर्वात चांगला भाग म्हणजे त्याचा इंटरफेस युजर अनुकूल आहे आणि त्याची रचना देखील अगदी सोपी, सरळ आहे.

आणखी वाचा : हा Realme चा १५ हजारांच्या रेंजमधील चांगला बजेट फोन, पण तुम्ही तो घ्यावा का? जाणून घ्या

मोबाईल अ‍ॅप द्विभाषिक आहे. म्हणजेच तुम्हाला याची माहिती हिंदी आणि इंग्रजीमध्ये मिळू शकेल. याशिवाय, तुम्ही यामधून PDF दस्तऐवज डाउनलोड, प्रिंट, शोध आणि झूम इन आणि झूम आउट करू शकाल. माहितीनुसार, हे अ‍ॅप डेटा गोळा करण्यासाठी सुरक्षित आणि ऑडिटेड API वापरते. तुम्ही हे अ‍ॅप indiabudget.gov.in वरून देखील डाउनलोड करू शकता.

तसं, तुम्हाला मेरिक या वेबसाइटवर बजेट-२०२२ शी संबंधित सर्व महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील. यासाठी तुम्ही आमचे सोशल मीडिया हँडल आणि यूट्यूब चॅनेल देखील पाहू शकता. या सर्व इंग्रजीमधील अपडेटसाठी, तुम्ही indianexpress.com ला भेट देऊ शकता. याशिवाय, तुम्हाला अर्थसंकल्पाच्या दिवशी सर्व प्रमुख व्यवसाय आणि वृत्तवाहिन्यांवर केंद्रीय अर्थसंकल्प २०२२ शी संबंधित अद्ययावत अपडेट्स मिळू शकतील.