अमेरिकेतील DoNotPay या स्टार्टअपने अलीकडेच AI टेक्नॉलॉजीवर आधारित जगातील पहिला रोबोट वकील लॅान्च केला आहे. म्हणजेच आता वकिलांचे काम ‘रोबोट’ म्हणजेच AI वकील करणार आहे. DoNotPay नावाचा कृत्रिम बुद्धिमत्ता असलेला चॅटबॉट स्वतःला जगातील पहिला रोबोट वकील समजतो. ही कंपनी सामन्यतः लोकांना ट्रॅफिक चलन प्रकरणे हाताळण्यासाठी मदत करते. मात्र या कंपनीचा रोबोट वकील एका अडचणीत सापडला आहे. विना परवाना कायद्याचा सराव केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. ते काय आहे ते जाणून घेऊयात.

DoNotPay कंपनीचा या रोबोट वकील याच्यावर विना परवाना कायद्याचा सराव केल्याचा आरोप झाल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. शिकागोमधील लॉ फर्म असणाऱ्या एडल्सनने ३ मार्च रोजी त्या रोबोटविरोधात तक्रार दाखल केली आहे. हा AI रोबोट वकील कायद्याच्या पदवीशिवाय आपले काम करत असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याचे वृत्त रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिले आहे.

हेही वाचा : Lava कंपनीच्या ‘या’ स्मार्टफोनच्या विक्रीला आजपासून सुरुवात, जाणून घ्या किंमत आणि…

जे एडेलसन यांनी केलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, DoNotPay वास्तविकतेमध्ये रोबोट, वकील किंवा लॉ फर्म नाही. DoNotPay कडे कायद्याची पदवी नाही. त्याच्यावर कोणताही वकील देखरेख करत नाही. DoNotPay चा वापर पत्र तयार करणे, लहान दाव्यांबद्दल न्यायालयामध्ये केस दाखल करणे आणि रोजगाराच्या बाबतीत भेदभावावर कायदेशीर कागदपत्रे तयार करणे यासारख्या किरकोळ कामांसाठी केला जात असल्याचे सांगितले जाते. पण आता याला एक वकील म्हणून सादर केले जात आहे.

DoNotPay कंपनीचे सीईओ जोशुआ ब्राउडर यांनी एक ट्विट केले आहे . त्यात त्यांनी लिहिले आहे की ‘वाईट बातमी’.अमेरिकेमधील सर्वात श्रीमंत वर्गातील वकील जे एडेलसन माझ्या स्टार्टअप DoNotPay वर खटला भरत आहेत. त्यांनी लिहिले, मिस्टर एडेलसन आमच्यावर कायदेशीर हल्ला करत आहेत आणि कोणतेही AI संपुष्टात आणण्यासाठी न्यायालयीन आदेशाची मागणी करत आहेत. आता DoNotPay स्वतःवरील खटल्याला कसा सामोरे जातो हे पाहावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

स्मार्टफोन आणि इंटरनेट अ‍ॅक्सेस असलेल्‍या अन्य डिव्‍हाइसना सहसा न्यायालयात परवानगी दिली जात नाही. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र कंपनीने सांगितले की न्यायालयातील सुनावणीदरम्यान सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन केले जाईल. तसेच सुनावणीदरम्यान रोबोट वकील अ‍ॅपल एअरपॉड्सद्वारे कनेक्ट केला जाईल. मात्र आता रोबोटवरती कायद्याचा पदवीशिवाय सराव केल्याचा आरोप करण्यात आला आहे.