तुम्हाला तुमची रेल्वे नेमकी कुठं आहे,हे जाणून घ्यायचं आहे का? हे करण्याचा एक सोपा मार्ग आहे. आता रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने एक नवी सुविधा आणली आहे. आता प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅपवरून रेल्वेचा LIVE Status आणि पीएनआर स्थिती चेक करता येणार आहे. हे नवे फिचर mumbai based startup railofy ने आणले आहे. या फिचर अंतर्गत प्रवाशांना व्हॉट्सअ‍ॅपवरून प्रवासाची संपूर्ण माहिती मिळेल. ट्रेनची सद्यस्थिती, पीएनआर चेक करण्यासाठी तुम्हाला वेगळे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची गरज नाही.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला १० अंकांचा पीएनआर नंबर व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवर टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सर्व माहिती मिळेल याअंतर्गत अपकमिंग स्टेशन, ट्रेनची स्थिती याचीही माहिती दिली जाते. याशिवाय रेल्वे हेल्पलाइन नंबर १३९ डायल करून प्रवाशांना ट्रेन लाईव्ह स्टेटस चेक करणे शक्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्ज करताय? वेळीच व्हा सावधान! पोलिसांनी केले आवाहन, अन्यथा…

या पद्धतीने करा ट्रेनचे लोकेशन चेक

  • सर्वातआधी तुम्हाला Railofy च्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटवर +९१-९८८११९३३२२ हा क्रमांक सेव्ह करावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपला अपडेट करावे लागेल तसेच कॉन्टॅक्ट लिस्ट सुद्धा रिफ्रेश करावी लागेल.
  • तुमचा पीएनआर क्रमांक व्हॉट्सअ‍ॅपवर टाका.
  • पीएनआर नंबर सेंड केल्यावर तुम्हाला ट्रेनचे रिअल टाइम लोकेशन आणि इतर डिटेल्सची सर्व माहिती दिली जाईल.