जिओफोन नेक्स्ट नंतर रिलायन्स जिओ लॅपटॉप आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीच्या पहिल्या लॅपटॉप JioBook ला हार्डवेअर मंजूरी मिळाली आहे. याबाबतचे ऑनलाइन तपशील लीक झाले आहेत. जिओच्या इतर प्रोडक्टप्रमाणे याचीही किंमत परवडणारी असेल असं सांगण्यात येत आहे. जिओ बूकची लॅपटॉप सेगमेंटमधील Xiaomi, Dell, Lenovo आणि इतर लॅपटॉपशी स्पर्धा असेल. जिओचा लॅपटॉप Windows 10 OS द्वारे समर्थित असेल आणि ARM आधारित प्रोसेसरवर चालेल. यामध्ये प्रॉडक्ट आयडी ४००८३००७८ देण्यात आला आहे. मात्र, या लॅपटॉपचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाही. सूचीमध्ये कंपनीचे नाव Emdoor Digital Technology Co LTD असे दाखवले आहे. म्हणजेच Jio विक्रेत्याकडून उत्पादन खरेदी करू शकते आणि स्वतःच्या ब्रँडिंगसह विकू शकते. JioBook म्हणून BIS प्रमाणपत्र प्राप्त झाले असून Geekbench बेंचमार्किंग ऍप्लिकेशनवर दिसले आहे.

अहवालानुसार, अँड्रॉइड ओएस ११ सूचीबद्ध केले गेले होते, जे लॅपटॉपची वेगळी आवृत्ती असू शकते. सिंगल-कोअर टेस्टमध्ये १,१७८ आणि मल्टी-कोअर टेस्टमध्ये ४,२४६ स्कोअर करण्यात यशस्वी झाले. हे MediaTek MT8788 चिपसेट २ जीबी रॅमसह समर्थित असल्याचे सांगितले जाते. उर्वरित तपशील लवकरच समोर येण्याची शक्यता आहे. जिओने अद्याप लॉन्च तारखेबद्दल काहीही माहिती दिलेली नाही. लॅपटॉपबाबत पुढील काही महिन्यांत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

बीएसएनएलच्या ‘या’ प्लानमुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाची डोकेदुखी वाढली! रोज ५ जीबी डेटासह अनेक सुविधा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमधील एका अहवालात असे सुचवण्यात आले होते की, रिलायन्स कदाचित नवीन जिओ टॅबलेट विकसित करत आहे. एका नवीन जिओ टीव्हीचीही बातमी आहे. याशिवाय जिओ कंपनी ५ जी फोन देखील तयार करत आहे, जो लवकरच लॉन्च होऊ शकतो.