Samsung कंपनी ही एक लोकप्रिय मोबाइल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन्स कंपनी नवीन फीचर्ससह लॉन्च करत असते. नुकताच सॅमसंगने आपला नवीन स्मार्टफोन Galaxy A54 भारतात लॉन्च केला आहे. नवीन Samsung Galaxy A54 स्मार्टफोन कंपनीच्या मागील Galaxy A53 चे अपग्रेड डिव्हाईस आहे. Galaxy A54 नवीन डिझाइन, अपग्रेडेड हार्डवेअर आणि नवीनतम सॉफ्टवेअरसह उपलब्ध करून देण्यात आला आहे. Galaxy A53 आणि Galaxy A54 या स्मार्टफोन्समध्ये कोणता बेस्ट स्मार्टफोन आहे ते जाणून घेऊयात.
Galaxy A54 आणि Galaxy A53 चे डिझाईन
Galaxy A54 हा स्मार्टफोन ग्लास सँडविच डिझाईनमध्ये येतो. Galaxy A53 या फोनला प्लास्टिक बॅक पॅनलसह लॉन्च करण्यात आले होते. दोन्ही फोन IP67 रेटिंगसह येतात आणि ते पाणी आणि धूळ प्रतिरोधक आहेत. लहान स्क्रीन असूनही Galaxy A54 अधिक मोठा आहे आणि त्याचे वजन २०२ ग्रॅम इतके आहे.
Galaxy A54 आणि Galaxy A53 चा डिस्प्ले
Samsung Galaxy A54 मध्ये Galaxy A53 पेक्षा चांगली पण लहान स्क्रीन वापरकर्त्यांना मिळते. या स्मार्टफोनमध्ये १२०Hz चा रिफ्रेस्ट रेट आणि ६.४ इंचाचा AMOLED स्क्रीन मिळतो. Galaxy A53 मध्ये १२०Hz च्या रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा AMOLED देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी A54 स्मार्टफोनमध्ये नवीन Exynos 1380 प्रोसेसर देण्यात आला आहे ज्याने AnTuTu वर ५ लाखांपेक्षा जास्त स्कोअर केला आहे. Galaxy A53 मध्ये Exynos 1280 प्रोसेसर आहे ज्याने AnTuT वर ३.८ लाख गुस्कोअर केला आहे म्हणजेच, Galaxy A54 Galaxy A53 पेक्षा ३० टक्के वेगवान आहे.
कसा असणार कॅमेरा ?
Samsung Galaxy A54 या स्मार्टफोनमध्ये वापरकर्त्यांना ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळणार आहे. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि ५ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. तर Galaxy A53 मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप आहे. ज्यामध्ये ६४ मेगापिक्सलची प्रायमरी आणि १२ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स व ५ मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स वापरकर्त्यांना मिळणार आहे. या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामधून कमी उजेडामध्ये चांगल्या दर्जाचे फोटोज घेता येतात.
Samsung Galaxy A54 आणि Galaxy A53 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ५०००mAh ची बॅटरी आणि २५W चा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. दोन्ही फोनमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आले आहे. मात्र फोनच्या बॉक्समध्ये तुम्हाला चार्जर देण्यात आलेला नाही. लहान डिस्प्ले आणि अधिक कार्यक्षम प्रोसेसरमुळे Galaxy A54 ला Galaxy A53 पेक्षा जास्त चांगली बॅटरी लाईफ मिळणार आहे.
कोणता फोन खरेदी करावा ?
8 जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटचा Galaxy A54 हा स्मार्टफोन ३८,९९९ रुपयांना लॉन्च करण्यात आला आहे. तर Galaxy A53 हा स्मार्टफोन तुम्हाला ३३,४९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे.