Hotstar हे एक लोकप्रिय OTT प्लॅटफॉर्म आहे. लोकं सध्या मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. वेब सिरीज, स्पोर्ट्स, चित्रपट आणि अनेक प्रकारच्या गोष्टी त्यावर पाहता येतात. मात्र हॉटस्टारच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने +हॉटस्टारने एक ट्विट केले आहे. या ट्विटमुळे ग्राहक हॉटस्टार ओटीटी प्लॅटफॉर्मवर नाराज झाले आहेत. बऱ्याच वापरकर्त्यांची त्यांच्या सब्स्क्रिप्शनचे पैसे कंपनीकडे परत मागितले आहेत. हॉटस्टारने HBO बद्दल एक ट्विट केले आहे. नक्की हे ट्विट काय आहे आणि या ट्विटमध्ये काय सांगण्यात आले आहे ज्यावरून ग्राहक हॉटस्टारवर नाराज झाले आहेत ते जाणून घेऊयात.

काय आहे ट्विट ?

डिस्ने + हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मने HBO बद्दल आपल्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करत माहिती दिली आहे. ३१ मार्च २०२३ पासून या ओटीटी प्लेटफ्रॉमवरील सर्व ग्राहकांना HBO कंटेंटचा आनंद घेऊ शकणार नाही आहेत अशी माहिती ट्विटमधून देण्यात आली आहे. एचबीओ चॅनलबरोबर डिस्ने + हॉटस्टारने केलेला करार आता संपणार आहे. 

LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Why stress test of mutual fund is important
तुमच्या म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट काय सांगते? म्युच्युअल फंडाची स्ट्रेस टेस्ट महत्त्वाची का?
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  

डिस्ने + हॉटस्टारच्या या ट्विटनंतर एचबीओच्या प्रेक्षकांचा मूड ऑफ झाला आहे. हॉटस्टारवर इतके मोठ्या संख्येने ग्राहक आहेत की जे HBO कंटेंट पाहणे पसंत करतात. काही वापरकर्त्यांनी तर कमेंट करत आपल्या सब्स्क्रिप्शनचे पैसे परत मागितले आहे तर अनेक वापरकर्त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

हॉटस्टार २०१६ पासून HBO च्या शो चे लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. डिस्ने स्टार (पहिले स्टार इंडियाने) लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी २०१५ मध्ये एचबीओसह एक करार केला होता. या करारानंतर एचबीओवर ज्या दिवशी अमेरिकेत शो लॉन्च होयचे त्याच दिवशी भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिला जात होता. नंतर २०२० मध्ये याला डिस्ने + हॉटस्टार असे रीब्रँड करण्यात आले.

हेही वाचा : Tech Layoffs: १२ हजार कमर्चाऱ्यांच्या कपातीनंतर Google चा आणखी एक धक्का; घेतला ‘हा’ मोठा निर्णय

हॉटस्टारचे ग्राहक या महिन्याच्या अखेरपर्यंत एचबीओवरील कंटेंट पाहू शकतात. त्यामुळे त्यामधील काही बघायचे राहिले असल्यास तुम्ही ते या महिन्यापर्यंत ते पाहू शकता. आयपीएल प्रेमींसाठी सुद्धा एक महत्वाची माहिती समोर आली आहे. यंदा IPL २०२३ सुद्धा डिस्ने + हॉटस्टारवर पाहता येणार नाही. तर Jio Cinema वर आयपीएलचे सामने तुम्हाला बघता येणार आहे.