Har Ghar Tiranga: हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत जर तुम्हीही तुमच्या घराच्या छतावर तिरंगा फडकवत असाल तर ही महत्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. येथे आम्ही तुम्हाला पाच सोप्या स्टेप्समध्ये प्रमाणपत्र डाउनलोड कसे करावे याबद्दल माहिती सांगणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावरून देशभरात ‘हर घर तिरंगा अभियान’ साजरा करण्यात येत आहे. ज्या अंतर्गत प्रत्येक ठिकाणी घरोघरी तिरंगा फडकवत आहेत.

१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन

स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत सरकारने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची घोषणा केली आहे. हर घर तिरंगा अभियान हा स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवाचा एक भाग आहे. २२ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे अभियान सुरू केले होते. १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान पंतप्रधान मोदींनी लोकांना घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले होते. या अभियानांतर्गत नागरिकांना स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी घराच्या छतावर राष्ट्रध्वज फडकावण्यास प्रवृत्त करण्यात आले आहे. ज्यांनी त्यांच्या छतावर राष्ट्रध्वज फडकवला आहे ते त्याचे प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकतात. त्याच वेळी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना २ ते १५ ऑगस्ट दरम्यान सोशल नेटवर्किंग साइट्सवरील प्रोफाइल पिक्चर बदलण्याची देखील सूचना केली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

( हे ही वाचा: मंगळ संक्रमणासोबत संपला महाविनाशक अंगारक योग! ‘या’ राशीच्या लोकांसाठी सुरू होतील ‘अच्छे दिन’)

हर घर तिरंगा अभियानाचे प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे

  • प्रथम तुम्ही अधिकृत वेबसाइट https://amritmahotsav.nic.in/har-ghar-tiranga.htm वर जा.
  • त्यानंतर तुमचे नाव आणि मोबाईल नंबरसह प्रोफाइल पिक्चर उपलब्ध करून द्या
  • मग येथे तुमच्या Google खात्याने लॉग इन करा. यानंतर तुम्हाला तुमच्या लोकेशनला सुरू करावे लागेल.
  • यानंतर ध्वज तुमच्या लोकेशनवर पिन करा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर प्रमाणपत्र दिसेल.
  • तुम्ही येथे क्लिक करून हे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.