scorecardresearch

Premium

जगातील सर्वांत महागडा फोन नीता अंबानींकडे? खरं की खोटं? असा मोबाईल खरंच असतो का? जाणून घ्या सत्य…

Most Expensive Phone: मुकेश अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब महागड्या छंदांसाठी नेहमीच ओळखले जाते. मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वांत महागडा फोन असल्याची चर्चा रंगली आहे….पण हे खरं आहे का..?

Nita Ambani Phone
निता अंबानींच्या मोबाईलची किंमत ३९६ कोटी? (Photo-social media)

Most Expensive Phone: स्मार्टफोन उद्योगात कंपन्या दररोज स्मार्टफोन लाँच करत असतात. कंपन्या आपले स्मार्टफोन एकामागून एक नवीन फीचर्ससह सादर करत आहेत. लोक त्यांच्या बजेट आणि सोयीनुसार स्मार्टफोन निवडतात. बाजारात बजेट ते प्रीमियम फोन उपलब्ध आहेत. ज्या लोकांचे बजेट चांगले असते ते सर्वोत्तम आणि सर्वात महाग स्मार्टफोन खरेदी करतात, यातच आता आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी निता अंबानी यांच्याकडे जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन असल्याची चर्चा सुरु आहे. पण हे खरं आहे का? नीता अंबानी सर्वात महागडा फोन वापरतात का.., चला तर जाणून घेऊया नेमकं सत्य काय..?

जगभरातील श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी कुटुंबाच नाव सामील होतं. अर्थातच भारतातील सर्वाधिक श्रीमंत लोकांच्या यादीत अंबानी हे नाव आघाडीवर आहे. आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अशी उद्योगपती मुकेश अंबानी यांची ओळख आहे. मुकेश अंबानी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब महागड्या छंदांसाठी नेहमीच ओळखले जाते. उद्योगपती मुकेश अंबांनी यांची पत्नी नीता अंबानींचं राहणीमान हे नेहमीच त्यांच्या प्रतिष्ठेला शोभणारं असंच आहे. त्यांचं राहणीमान, त्यांचे कपडे, आलिशान घड्याळं, ब्रँडेड सँडल, महागडे परफ्युम हे सगळंचं नेहमीच चर्चेचा विषय असतो.

kerala mercy killing news
दोन मुलांना दुर्मिळ आजार, संपूर्ण कुटुंबाच्या इच्छामरणासाठी केरळमधील दाम्पत्य सर्वोच्च न्यायालयात जाणार; म्हणाले…
Drugs case arrest Nashik
नाशिकमध्ये अमली पदार्थाची खरेदी, विक्री प्रकरणी पाच जण ताब्यात
children beg in siddheshwar yatra
सोलापुरात सिध्देश्वर यात्रेत भीक मागणाऱ्या मुलांचा शोध
man commits suicide after wife sister in law asking money for liquor
पिंपरी : दारूसाठी पैसे मागणाऱ्या पत्नी, मेहुणीच्या त्रासाला कंटाळून देहूरोडमध्ये तरुणाची आत्महत्या

आता नीता अंबानी या जगातील सर्वात महागडा असा मोबाईल फोन वापरतात, अशी चर्चा रंगली आहे आणि या फोनची किंमत ऐकली तर आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना घाम फुटेल. त्या जो फोन वापरतात त्याची किंमत ३९६ कोटी असल्याची चर्चा आहे. ‘Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond’ हा जगातील सर्वात महागडा फोन मानला जातो, ज्याची किंमत भारतीय चलनात ३९६ कोटी रुपये आहे. हाच फोन नीता अंबानी वापरतात, अशी चर्चा आहे.

(हे ही वाचा:आयफोन १६ लाँच होण्यापूर्वी फिचर्स अन् डिझाईन आले समोर! जाणून घ्या काय होणार बदल…)

Apple ने २००४ मध्ये हा फोन लाँच केला होता. हा फोन पूर्णपणे २४ कॅरेट सोन्यापासून बनवला आहे. यावर प्लॅटिनमची कोटींग देखील आहे. त्यामुळे हा फोन पडला तरी तुटणार नाही. या फोनच्या मागे महागडा असा गुलाबी रंगाचा हिरा देखील आहे. हा फोन कोणाही हँक करू शकत नाही आणि जर हॅक करण्याचा प्रयत्न केलाच तर लगेचच त्याचा अलर्ट युजर्सला जातो. म्हणूनच या फोनची किंमत ३११ कोटी असल्याचं सांगण्यात येत आहे.

मात्र, हा दावा खोटा असल्याचा खुलासा रिलायन्सच्या सूत्रांनी एका इंग्रजी साईटला केली आहे. नीता अंबानींकडे ‘Falcon Supernova iPhone 6 Pink Diamond’ फोन नाही, अशी माहिती रिलायन्सच्या सूत्रांनी दिली आणि ते कोणता फोन वापरतात, याविषयीही माहिती उपलब्ध झालेली नाही, असे वृत्त डीएनए इंडियाने दिले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Does nita ambani own falcon supernova iphone 6 pink diamond heres information pdb

First published on: 30-11-2023 at 13:25 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×