2500-year-old Sanskrit language problem solve: अमेरिकेमधील केंब्रिज विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या डॉक्टर ऋषी राजपोपाट यांनी संस्कृत व्याकरणकार पाणिनीने लिहेल्ल्या ‘अष्टध्यायी’मधील व्याकरणासंदर्भातील चूक दुरुस्त केली आहे. इसवीसनपूर्व पाचव्या आणि सहाव्या शतकामध्ये लिहिलेल्या या संस्कृत भाषेतील भाषाग्रंथातील चूक सुधारल्याबद्दल डॉ. राजपोपाट यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

चार हजार सुत्रांचा समावेश असलेल्या ‘अष्टध्यायी’ हा ग्रंथ संस्कृत भाषेमागील विज्ञान समजावून सांगतो असं सांगितलं जातं. या ग्रंथामधील रचना आणि नियम पाहून हा फारच क्लिष्ट ग्रंथ असल्याचं सांगितल जातं. शब्द निर्माण करण्यासाठी यामध्ये नमूद करण्यात आलेले नियम हे समजून घेण्यास फारच कठीण असल्याचं म्हटलं जातं. या ग्रंथामधील माहितीच्या आधारे एखादा शब्द कसा तयार करावा किंवा संस्कृतमधील वाक्य कसं तयार करावं याचं मार्गदर्शन केलं जातं. मात्र यामध्येही बरेचदा पाणिनीचे दोनहून अधिक नियम एकाचवेळी वापरले जायचे आणि त्यामधून संभ्रम निर्माण व्हायचा.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Mukesh Ambani
जागतिक महाश्रीमंतांमध्ये मुकेश अंबानी नवव्या स्थानी; देशातील धनाढ्याच्या संपत्तीत वर्षभरात ४१ टक्क्यांची वाढ
english medium schools in pune advertising on social media to attract students
पुणे: इंग्रजी शाळांवर समाजमाध्यमांत जाहिराती करण्याची वेळ… नेमके झाले काय?

हा गोंधळ टाळण्यासाठी पाणिनीने मेटा रुल म्हणजेच (नियमांचा नियम) लिहून ठेवला. पारंपारिक पद्धतीमध्ये हा नियम पुढील प्रमाणे होता : “दोन समान दर्जाचे नियम वापरताना संभ्रम निर्माण झाला तर जो नियम ‘अष्टाध्यायी’मध्ये नंतर लिहिण्यात आला आहे त्याला प्राधान्य क्रमाने वापरावं.”

An 18th-century copy of Panini’s ‘Dhatupatha’, a list of Sanskrit verbal roots attached to his grammar, the Aṣhṭadhyayi. (Source: Cambridge University Library)

मात्र आपल्या पीएचडीच्या ‘इन पाणिनी वी ट्रस्ट’ नावाच्या थिसिसीमध्ये डॉ. राजपोपाट यांनी हा मेटा रुल स्वीकारता येणार नाही, असं म्हटलं आहे. पाणिनीच्या सुत्रांचा साधा आणि समजेल असा अर्थ काढावा जो शब्दांशी अधिक प्रमाणिक असेल असं डॉ. राजपोपाट यांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप; पण हिंदू धर्मात भगव्या रंगाला एवढं महत्त्वं का? हिंदू साधू-संत भगवी वस्त्रं का परिधान करतात?

मेटा रुल कायमच चुकीच्या अर्थाने समजून घेण्यात आला असंही डॉ. राजपोपाट यांनी म्हटलं आहे. पाणिनीला नियम शब्दाच्या डावीकडे वापरावा की उजवीकडे वापरावा याबद्दल सांगयचं होतं. उजवीकडील शब्दानुसार नियम वापरावा असा या मेटा रुलचा अर्थ असल्याचं डॉ. राजपोपाट यांचं म्हणणं आहे. हा नियम वापरला तर ‘अष्टाध्यायी’ हे अगदी अचूक भाषा निर्माण करणारं मशिन असल्याचं डॉ. राजपोपाट यांच्या लक्षात आलं. नियम अशापद्धतीने वापरल्यास प्रत्येकवेळी यामधून अचूक संस्कृत शब्द आणि वाक्य निर्माण करतात येतात असं डॉ. राजपोपाट यांचं म्हणणं आहे.

डॉ. राजपोपाट यांनी लावलेला शोध हा क्रांतीकारी असल्याचं या क्षेत्रातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या नियमांचा वापर केल्याने कंप्युटर्समध्ये पहिल्यांदाच पाणिनीचं व्याकरण फीड करता येणार आहे असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. ‘अष्टाध्यायी’मधील लिनियर आणि अगदी थेट नियमांमुळे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (एनएलपी) सिस्टीमसाठीही याचा वापर करता येईल. जसा तो सध्या चॅटजपीटी बोटमध्ये केला जातो.

“कंप्युटर क्षेत्रातील संशोधकांनी एनएलपीवर काम करताना नियमांवर आधारित धोरणाला ५० वर्षांपूर्वीच तिलांजली दिली. त्यामुळे कंप्युटर्सला बोलणाऱ्याचं उद्दीष्ट आणि पाणिनीच्या व्याकरणासंदर्भातील नियमांची सांगड घालून मानवी आवारज निर्माण करणं ही फार मोठी गोष्ट ठरणार आहे. मानव आणि मशिनींमधील संवादाच्या क्षेत्रातील हा मत्त्वपूर्ण शोध असेल तसेच तो भारतामधील ऐतिहासिक बृद्धीमत्तेला अधोरेखित करणाराही असेल,” असं डॉ, राजपोपाट यांनी म्हटलं.

भारतामध्ये संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या २५ हजार इतकी आहे. मात्र या भाषेसंदर्भात कुतूहल असणाऱ्यांची आणि शिकणाऱ्यांची संख्या मागील १० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संस्कृत ही सर्व भाषांची मूळ भाषा असल्याचं माणलं जातं. १८०० च्या शतकापासून युरोपीयन लोकही संस्कृत भाषेचा अभ्यास करत आहेत.