उन्हाळ्यात वीज बिल भरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेच आहे. कारण या दिवसात वीज बिल जास्त येते. त्यामुळे ऑनलाईन वीज बिल भरताना फक्त एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. या चुकीमुळे तुमचे हजारो रुपयांचे नुकसान होऊ शकते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे कसे होईल? तर तुम्हाला आम्ही याच प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. मार्च महिन्यापासून महाराष्ट्रासह अनेक राज्यांत उन्हाचा कडाका वाढला आहे. यामुळे नागरिक थंड हवेसाठी पंख्यासह कूलर, एसीचा आधार घेतात. यामुळे वीज बिल देखील जास्त येते. मात्र हे वीज भरताना ३ विशेष गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. या ३ गोष्टी कोणत्या जाणून घेऊ…

ग्राहक क्रमांक

पेटीम, फोन-पे, जी-पे किंवा इतर कोणत्याही पोर्टलवरून वीज बिल भरताना तुम्हाला वीज बिलावरील ग्राहक क्रमांकाची (customer number) सर्वात काळजीपूर्वक टाकावा लागतो. अनेकदा दिसून येते की, ग्राहक क्रमांक टाकताना चूक होते आणि त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. कारण घाईत गडबडीत पेमेंट करताना आपण छोट्याश्या चुकीकडे लक्ष देत नाही.

ग्राहकाचे नाव

ग्राहक क्रमांक टाकल्यानंतर आता तुम्हाला ग्राहकाचे नाव देखील काळजीपूर्वक पाहायला हवे. ग्राहक क्रमांकानंतर लगेचच ग्राहकाचे नाव समोर येते. मात्र अनेकदा आपण नावाकडे अजिबात पाहत नाही आणि पुढची प्रोसेस चालू करतो. यामुळेही तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. तुम्ही ग्राहक क्रमांक, ग्राहकाचे नाव आणि बिलाची रक्कम एकदा तपासून पाहा. यासह तुम्ही ही भरलेली माहिती सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा ती भरावी लागणार नाही.

‘पीएनबी’कडून ५ लाखांपासून पुढील धनादेशांसाठी ‘पीपीएस’ बंधनकारक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यूपीआय पेमेंट

यूपीआय पेमेंट करतानाही खूप काळजी घ्यावी लागते. कारण यूपीआय पेमेंट सेवा ही खूप जलद मानली जाते. मात्र यावरून पेमेंट करतानाही वरील दिलेल्या गोष्टींची काळजी घ्यावी अन्यथा पुन्हा पैसे जाऊ शकतात. यात एकदा पेमेंट केल्यानंतर आपण काहीही करू शकत नाही, त्यामुळेच तुम्ही यूपीआय पेमेंट करता तेव्हा सर्वप्रथम सर्व भरलेली माहिती काळजीपूर्वक तपासा. या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर वीज भरताना तुमचे आर्थिक नुकसान होणार नाही.