Meta ही फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. हीच Meta कंपनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. मेटा टेक्स्ट आधारित अपडेट कंटेट शेअर करण्यासाठी किंवा पोस्ट करण्यासाठी एका App वर काम करत आहे. हे अ‍ॅप ActivityPub वर आधारित असणार आहे जे सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे. याचा वापर मास्टोडॉनद्वारे देखील केला जातो. जे ट्विटरचे प्रतिस्पर्धी आहे.

यावरून Twitter चे सीईओ एलॉन मस्क यांनी नुकतीच मेटाचे मालक मार्क झुकरबर्ग यांची खिल्ली उडवली आहे. त्यांनी झुकरबर्ग यांना CopyCat म्हणत ट्रोल केले आहे. करणं मेटा एक अ‍ॅपवर काम करत आहे जे आगामी काळात ट्विटरशी स्पर्धा करू शकते. एलॉन मस्क यांनी काही कालावधीआधी त्यांच्या विकसकांसाठी Twitter च्या मोफत API प्रवेश बंद केला. त्या बदल्यात कांपनी आता सशुल्क सेवा देत आहे. इतकेच नव्हे तर ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर एलॉन मस्क यांनी आपली भारतीय स्पर्धक KOO चे अकाउंट देखील निलंबित केले होते. एवढेच नाही तर मास्टोडॉनचे अकाउंटही ट्विटरवरून सस्पेंड करण्यात आले.

हेही वाचा : Meta देणार Twitter ला टक्कर! मार्क झुकरबर्ग लॉन्च करणार ‘हे’ नवीन अ‍ॅप, जाणून घ्या

एलॉन मस्क यांच्या कॉपी कॅटच्या पोस्टला अनेक वापरकर्त्यांनी उत्तर दिले आहे. एका वापरकर्त्याने गंमतीत लिहिले की, “फेसबुकने रॉकेट आणि इलेक्ट्रिक कार बनवायलाही सुरुवात करावी.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Meta ही फेसबुकची पॅरेंट कंपनी आहे. हीच Meta कंपनी मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटरशी स्पर्धा करण्यासाठी एका नवीन प्लॅटफॉर्मवर काम करत आहे. मेटा टेक्स्ट आधारित अपडेट कंटेट शेअर करण्यासाठी किंवा पोस्ट करण्यासाठी एका App वर काम करत आहे. हे अ‍ॅप ActivityPub वर आधारित असणार आहे जे सोशल नेटवर्किंग प्रोटोकॉल आहे. याचा वापर मास्टोडॉनद्वारे देखील केला जातो. जे ट्विटरचे प्रतिस्पर्धी आहे. मेटा ज्या अ‍ॅपवर काम करत आहे त्या अ‍ॅपला P92 हे कोडनेम देण्यात आले आहे. रिपोर्टनुसार हे येत्या काळामध्ये अ‍ॅपचे ब्रॅडिंग इंस्टाग्रामच्या अंतर्गत केले जाणार आहे. म्हणजेच इंस्टाग्राम वापरकर्ते त्यांचे युजरनेम आणि पासवर्ड रजिस्टर करून या अ‍ॅपचा वापर करू शकणार आहेत.