scorecardresearch

स्मार्टफोनसाठी स्वस्तातील Tempered Glass वापरताय? महागात पडेल ही खरेदी; जाणून घ्या

स्मार्टफोनला काही होऊ नये म्हणून आपण त्याला बॅक कव्हर आणि स्क्रीनच्या सुरक्षेसाठी आपण स्क्रीन गार्ड लावतो.

स्मार्टफोनसाठी स्वस्तातील Tempered Glass वापरताय? महागात पडेल ही खरेदी; जाणून घ्या
Tempered Glass-प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

आपण प्रत्येकजण हल्लीच्या काळात स्मार्टफोन्स वापरतो. आपण स्वतःपेक्षा त्या स्मार्टफोन्सची काळजी घेत असतो. स्मार्टफोनला काही होऊ नये म्हणून आपण त्याला बॅक कव्हर आणि स्क्रीनच्या सुरक्षेसाठी आपण स्क्रीन गार्ड लावतो. हे स्क्रीनगार्ड अनेक प्रकारांमध्ये तुम्हाला उपलब्ध होतात. रस्त्याशेजारी असणाऱ्या दुकानांमधून घेतल्यास ते तुम्हाला ५० ते १०० रुपयांमध्येही उपलब्ध होते. काही लोकं याला टेम्पर्ड ग्लास असेही म्हणतात.

अनेकवेळा या ग्लासची किंमत त्या स्मार्टफोन्सच्या मॉडेलवर सुद्धा ठरत असते. आपण जर हे ऑनलाईन स्वरूपात खरेदी केलेत तर १०० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत हे मिळू शकते. पण मुख्य प्रश्न हा आहे की टेम्पर्ड ग्लास लावून सुद्धा फोनचा डिस्प्ले का तुटतो. आता जाणून घेऊयात असे का होते ते .

हेही वाचा : Airtel-Jio-Vi Postpaid OTT Plan: एक वर्ष हॉटस्टार, Amazon Prime फ्री अन्…;

तुमच्या फोनच्या डिस्प्लेला स्क्रॅच येऊ नये म्हणून हे टेम्पर्ड ग्लास उपयोगी पडतात. पण तुम्ही जर डिस्प्ले तुटण्यापासून वाचण्यासाठी तुम्ही हे ग्लास लावलेत तर ते चुकू शकते. मोठे स्क्रीन गार्ड डिस्प्लेवर लावल्यानंतर स्क्रीन आणि कव्हर यांच्यामधील गॅप उरत नाही. बाजारातील स्वस्तात मिळणारे टेम्पर्ड स्क्रीन गार्ड हे तुमच्या डिस्प्लेला स्क्रॅच होण्यापासून वाचवतो. फोन पडल्यावर त्याची सुरक्षा हे गार्ड करू शकत नाहीत. थोडे महागातले टेम्पर्ड ग्लास तुमच्या फोनच्या डिस्प्लेचे संरक्षण करू शकतात. या गार्ड ला तयार करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. फोन पडल्यावर पण डिस्प्लेवर प्रेशर येणार नाही अशी याची रचना असते. यामध्ये वापरली जाणारी ग्लास सुद्धा नियमित ग्लासपेक्षा बरेच वेगळे असतात त्यामुळेच त्याच्या किंमती जास्त असतात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-01-2023 at 15:35 IST

संबंधित बातम्या