टेस्ला कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क हे जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. २०२२ साली जेव्हा त्यांनी एक्स (ट्विटर) हे ॲप विकत घेतले, तेव्हा त्यांनी कंपनीमध्ये अनेक मोठे बदल केले. त्यातील एक मोठा निर्णय म्हणजे कंपनीचे तत्कालीन सीईओ पराग अग्रवाल यांना काढून टाकणं हा होता. तर आता एक्स (ट्विटर) च्या काही माजी अधिकाऱ्यांनी एलॉन मस्कला कोर्टात खेचलं आहे. ट्विटर खरेदी केल्यानंतर काही अधिकाऱ्यांना त्याने कामावरून काढून टाकलं होतं. तर आता या माजी अधिकाऱ्यांनी एलॉन मस्क विरोधात खटला दाखल केला आहे.

यामध्ये कंपनीचे माजी सीईओ पराग अग्रवाल यांचाही समावेश आहे. माजी अधिकारी दावा करतात की, ऑक्टोबर २०२२ मध्ये एक्स (ट्विटर) वर नियंत्रण मिळवून मस्कने कंपनी USD ४४ अब्ज, USD ५४.२० प्रति शेअरमध्ये विकत घेतली होती. त्यांच्या योजनांमध्ये एक्स (ट्विटर)च्या संपादन किमतीवर एक वर्षाचा पगार आणि अनव्हेस्टेड स्टॉक अवॉर्ड्स Valued चा समावेश होता. पण, नोकरीवरून काढून टाकल्यानंतर भरपाई म्हणून दिली जाणारी रक्कम चक्क १२८ मिलियन डॉलर्स पेक्षा जास्त एलॉन मस्कने अजूनही दिली नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे आणि एक्स (ट्विटर)चे माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एलॉन मस्क यांना कोर्टात खेचलं आहे.

हेही वाचा…गूगल ड्राइव्ह लवकरच आणणार ‘हे’ अपडेट्स; व्हिडीओ अपलोडपासून ते सर्च करण्यापर्यंत…. होणार ‘हे’ नवीन बदल

सोमवारी काही अधिकाऱ्यांनी कोर्टात एलॉन मस्क यांच्या विरोधात खटला दाखल केला आहे. यामध्ये एक्स (ट्विटर)चे माजी सीईओ पराग अग्रवाल, माजी सीएफओ नेड सेगल, माजी चीफ लीगल ऑफिसर (मुख्य कायदेशीर सल्लागार) विजया गड्डे आणि माजी जनरल काउंसिल सेन एजेट यांचा समावेश आहे. २०२२ मध्ये ज्या दिवशी मस्कने एक्स (ट्विटर) खरेदी केले, तेव्हा या अधिकाऱ्यांना विनाकारण काढून टाकण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कॅलिफोर्नियाच्या नॉर्दर्न डिस्ट्रिक्टमधील फेडरल कोर्टात दाखल करण्यात आलेल्या खटल्यात म्हटले आहे की, “कोणतेही बिल न भरणे हा मस्कच्या स्वभावाचा एक भाग आहे. लोकांचे पैसे अडकवून ठेवून एलॉन मस्क इतरांना कोर्टाचे दरवाजे ठोकण्यास भाग पडतो. आपल्यावर कोणतेही नियम लागू होत नाहीत असं त्याला वाटतं”; असे माजी अधिकारी म्हणत आहेत. मस्कने आधी ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला, मात्र नंतर तो डीलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी ट्विटरच्या स्टेकहोल्डर्सची बाजू माजी अधिकाऱ्यांनी धरली होती, त्यामुळे एलॉन मस्कला ट्विटर खरेदी करावे लागले. कारण त्याला त्यांचे विभाजन द्यायचे नव्हते. माजी अधिकारी म्हणतात की, एलॉन मस्कने खोटे कारण दिले आणि त्याचा निर्णय कायम ठेवण्यासाठी विविध कंपन्यांचे कर्मचारी नियुक्त केले. एलॉन मस्क त्याच्याशी असहमत असलेल्या कोणावरही कठोर कारवाई करण्यासाठी आपली संपत्ती आणि शक्ती वापरतो; असे यावेळी माजी अधिकाऱ्यांनी खटला दाखल करताना सांगितले आहे.