scorecardresearch

फेसबुक देत आहे कमाईची संधी! Reels आणि Videos च्या माध्यमातून कमवता येतील पैसे

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की फेसबुक रील्स निर्मात्यांना कमाईची संधी देईल. यासाठी लवकरच फेसबुकतर्फे नवीन फीचर लॉंच केले जाईल.

फेसबुक रील्स सर्वात आधी २०२० साली टिकटॉकला टक्कर देण्यासाठी लॉंच करण्यात आले होते. (प्रातिनिधिक फोटो)

फेसबुक रील्स (Facebook Reels)चे ग्लोबल लॉंचिंग झाले आहे. फेसबुकवर रील्स म्हणजेच शॉर्ट व्हिडीओ शेअर करणाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. शॉर्ट व्हिडीओ फीचर फेसबुक रील्स जगभरातील जवळपास १५० देशांमध्ये लॉंच झाले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस वापरकर्त्यांसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. फेसबुक रील्स सर्वात आधी २०२० साली टिकटॉकला टक्कर देण्यासाठी लॉंच करण्यात आले होते.

मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की फेसबुक, रील्स निर्मात्यांना कमाईची संधी देईल. यासाठी लवकरच फेसबुकतर्फे नवीन फीचर लॉंच केले जाईल. याअंतर्गत आता फेसबुक या शॉर्ट व्हिडीओच्या माध्यमातून होणाऱ्या कमाईचा एक वाटा रील बनवणाऱ्यांसोबत वाटण्याची तयारी करत आहे. येत्या काही आठवड्यांत फेसबुक प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू करणार आहे. याचा अर्थ असा की कंटेंट क्रिएटर्स आता फेसबुकच्या माध्यमातून रील्स बनवून कमाई करू शकतील.

Google Pay च्या मदतीने करता येणार सोन्याची ऑनलाइन खरेदी-विक्री; ‘या’ स्टेप्सचा करा वापर

टिकटॉकला आव्हान आणि अनेक देशांमधील अधिकाधिक कंटेंट क्रिएटर्सना आपल्या प्लॅटफॉर्मकडे आकर्षित करण्यासाठी फेसबुकने हा निर्णय घेतला आहे. मेटा ने कळवले की ते प्रायोगिक तत्वावर रील बनवणाऱ्या निर्मात्यांसह जाहिरात महसूल सामायिक करणार आहे. तसेच, फेसबुकने सांगितले की ते सर्वप्रथम अमेरिका, कॅनडा आणि मॅक्सिकोमधील रीलवरील कमाई शेअर करणे सुरू करेल. पुढील काही आठवड्यांत ते आणखी देशांमध्ये लॉंच केले जाईल. फेसबुकने सांगितले की ते, त्यांची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या भारतात लवकरच हे फीचर लॉंच करण्याची योजना आखत आहे.

रील्सच्या माध्यमातून अशी होणार कमाई

  • सध्याच्या प्रणाली अंतर्गत, वापरकर्ते कोणत्याही निर्बंधाशिवाय एकामागून एक रील पाहत राहतात आणि त्यांच्यामध्ये कोणतीही जाहिरात येत नाही. फेसबुकने आता यामध्ये नवा प्रयोग केला आहे.
  • प्रायोगिक तत्त्वावर सहभागी होणाऱ्या कंटेंट निर्मात्यांना दोनपैकी कोणतेही एक जाहिरात स्वरूप निवडावे लागेल.
  • पहिला फॉरमॅट बॅनरचा आणि दुसरा फॉरमॅट स्टिकर्सचा आहे. बॅनर फॉरमॅटमधील जाहिराती फेसबुक रील्सच्या तळाशी पारदर्शक पद्धतीने दिसतील. स्टिकर्स मोडमध्ये जाहिरात कोणत्याही स्टिकर्सप्रमाणे रिल्सवर दिसेल.
  • कंटेंट निर्मात्यांना त्यांना पाहिजे असलेल्या रीलच्या कोणत्याही भागावर स्टिकर्स लावण्याची परवानगी असेल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Facebook is giving you a chance to earn money through reels and videos pvp

ताज्या बातम्या