गेल्या काही वर्षांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लोकांशी संपर्कात राहणे खूप सोपे झाले आहे. तुम्ही फोनद्वारे दूरवरील व्यक्तीला कॉल करून त्याचा हालचाल विचारू शकता किंवा मेसेज करून त्यास शुभेच्छा देऊ शकता. छोटेखानी संदेश पाठवण्यासाठी एसएमएसचा (शॉर्ट मेसेज सर्व्हिस) मोठ्या प्रमाणात वापर होतो. याद्वारे काही सेकंदांमध्येच जगातील कोणत्याही ठिकाणी मेसेज पाठवता येते. आताही लाखो लोक अनेक माध्यमातून टेक्स्ट मेसेज पाठवतात. पण पहिला एसएमएस कधी आणि कोणाला पाठवण्यात आला होता? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? तर चला याबाबत जाणून घेऊया.

जगातील पहिला टेक्स्ट मेसेज ३ डिसेंबर १९९२ रोजी पाठवण्यात आला होता आणि त्यातून क्रिसमसच्या शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. या पहिल्या एसएमएसमध्ये ‘मेरी क्रिसमस’ असे पाठवण्यात आले होते. हा संदेश वोडाफोन नेटवर्कच्या माध्यमातून पाठवण्यात आला होता आणि या मेसेजमध्ये १४ अक्षर होते.

(‘हे’ 5 स्टाइलीश फोन्स 20 हजारांखाली उपलब्ध, ‘5G’सह मिळत आहेत अनेक फीचर्स)

पहिला टेक्स्ट मेसेज वोडाफोनचे इंजिनिअर नील पापवोर्य यांनी आपल्या संगणकाद्वारे रिचर्ड जारविस यांना पाठवला होता. रिचर्ड जार्विस यांनी हा टेक्स्ट मेसेज आपल्या ऑर्बिटल ९०१ हँडसेटमध्ये रिसिव्ह केला होता. रिचर्ड त्यावेळी कंपनीचे संचालक होते.

असे काम करते एसएमएस तंत्रज्ञान

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे तंत्रज्ञान प्रथम टेक्स्टचे सिग्नलमध्ये रुपांतर करते. त्यानंतर हे सिग्नल संदेश पाठवणाऱ्याच्या जवळ असलेल्या टॉवरवर पाठवले जातात. त्यानंतर हे सिग्नल एसएमएस सेंटरला पाठवले जातात. येथून ते रिसीव्हरच्या टॉवरवर पोहोचतात. शेवटी हे सिग्नल पुन्हा टेक्स्टमध्ये रुपांतरित केले जातात आणि प्राप्तकर्त्याकडे पाठवले जातात.