5 g phones under 20 thousand rupees : देशातील अनेक शहरांमध्ये आता ५ जी सेवा सुरू झाली असून नागरिक वेगवान इंटरनेटचा अनुभव घेत आहेत. ही सेवा वापरण्यासाठी ५ जी फोन आवश्यक आहे. चांगल्या फीचर्ससह ५ जी फोन तुम्हाला हवा असल्यास बाजारात काही उत्तम ५ जी फोन्स २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. या फोन्सवर एक नजर टाकूया.

१) सॅमसंग गॅलक्सी एम ३३ ५ जी

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
diy quick tips to save energy at home 3 tricks to reduce your electricity bill and save energy know how
उन्हाळ्यात तुमचे वीज बिल येईल २०-३० टक्क्यांनी कमी! वापरा फक्त ‘या’ ट्रिक्स; एसी वापरानंतरही ‘नो टेन्शन’
my portfolio, small cap fund
‘माझा पोर्टफोलियो’ : स्मॉल आणि मिडकॅपमधील अस्थिरतेची झळ, पहिला त्रैमासिक आढावा- २०२४
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन अमेझॉनवर १८ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या फोनमध्ये ऑक्टा कोअर प्रोसेसर मिळत असून ६.६ इंचा डिस्प्ले मिळतो. फोनमध्ये ६ हजार एमएएचची बॅटरी आणि यूएसबी टाइप सी चार्जिंग पोर्ट मिळत आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ८ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे.

(खरेदी केलेला APPLE IPHONE खरा आहे की बनावट, हे कसे ओळखाल? फॉलो करा ‘या’ टीप्स)

२) वनप्लस नॉर्ड सीई २ लाइट ५ जी

अमेझॉनवर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन १८ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. फोनमध्ये ६.५९ इंच डिस्प्ले असून तो अँड्रॉइड १२ वर आधारित ऑक्सिजन ओएसवर चालतो. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आले असून ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी ३३ वॉट सुपरवूकला सपोर्ट करते.

3) रेडमी नोट ११ प्रो + ५ जी

Redmi Note 11 Pro + 5G स्मार्टफोन अमेझॉनवर १९ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. फोन ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटरनल स्टोअरेज आणि ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटरनल स्टोअरेजसह उपलब्ध आहे. या फोनमध्ये १०८ एमपीचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला असून फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आले आहे.

(मस्तच! ‘IPHONE’ने कोणत्याही वस्तूचे करा मोजमाप, असे वापरा ‘हे’ भन्नाट फीचर)

४) रिअल मी ९ आय ५ जी

Realme 9i 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर १४ हजार ९९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी ८१० ५ जी चिपसेट देण्यात आले असून फोनमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच स्क्रिन देण्यात आली असून ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोअरेज मिळत आहे जी १ टीबी पर्यंत वाढवता येऊ शकते.

५) पोको एक्स ४ प्रो ५ जी

फ्लिपकार्टवर Poco X4 Pro 5G स्मार्टफोन १५ हजार ९९ रुपयांमध्ये मिळत आहे. या फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर देण्यात आले असून ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि ६.६७ इंच फूल एचडी अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे.