Fitshot Flair smartwatch : ब्लूटूथ कॉलिंगसह, हार्ट रेट, एसपीओ २ लेव्हल इत्यादी तपासता येत असल्याने स्मार्टवॉच ही लोकांमध्ये लोकप्रिय होत आहे. फिटनेसबाबत काळजी असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. फिटशॉटने महिलांसाठी Fitshot Flair smartwatch लाँच केली आहे. ही स्मार्टवॉच विशेषत: महिला वापरकर्त्यांना लक्षात घेऊन डिजाईन करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्मार्टवॉच दिसायला सुंदर असून ती पिंक, ब्ल्यू आणि ग्रीन या तीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. तुम्हाला ही घड्याळ क्रिसमसमध्ये विशेष ऑफरसह फ्लिपकार्टवरून १ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या स्मार्टवॉचमध्ये कोणते फीचर्स मिळतात जाणून घेऊया.

(गेमर्ससाठी पर्वणी! Amazon Prime Gaming लाँच झाले, फ्रीमध्ये डाऊनलोड करा ‘हे’ जबरदस्त गेम्स)

फीचर्स

Fitshot Flair smartwatch मध्ये आयपीएस एलसीडी स्क्रीन आणि ६० पेक्षा अधिक स्मार्टवॉच फेसेस मिळतात. स्मार्टवॉचला आयपी ६८ रेटिंग मिळाले आहे जे पाण्यापासून सुरक्षेची खात्री देते. स्मार्टवॉचमध्ये आधुनिक यूव्ही सेन्सर देखील देण्यात आले आहे ज्याद्वारे तुम्ही यूव्ही एक्सपोजर डिटेक्ट करू शकता.

१० पेक्षा अधिक स्पोर्ट्स मोड

फिटशॉट फ्लेयर स्मार्टवॉचमध्ये अनेक वेलनेस फिचर्स देण्यात आले आहेत. घड्याळात वॉकिंग, डांसिंग, बॅडमिंटन, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि १० पेक्षा अधिक स्पोर्ट मोड्स देण्यात आले आहेत. स्मार्टवॉचमध्ये एसपीओ २, यूव्ही लाइट स्ट्रेंथ डिटेक्शन, हार्ट रेट, बॉडी टेम्परेचर मॉनिटरिंग, मेन्स्ट्रुएशन ट्रॅकर उपलब्ध आहे.

(२०० एमपी कॅमेरासह लाँच झाला Infinix Zero Ultra 5G; १२ मिनिटांत होतो फूल चार्ज, जाणून घ्या किंमत)

स्मार्टवॉचमध्ये कॉल रिमाइंडर, शेड्युल रिमाइंडर, अप्लिकेशन पुश रिमाइंडर, अलार्म क्लॉक उपलब्ध आहे. कॉल किंवा मेसेज आल्यावर युजरला त्वरित मेसेज मिळेल आणि युजरला क्विक मेसेज फीचरचा वापर करून त्याला उत्तर देता येईल.

सिंगल चार्वर इतके दिवस चालते स्मार्टवॉच

Fitshot Flair smartwatch मध्ये ३०० एमएएचची बॅटरी देण्यात आली असून ती एकदा चार्ज केल्यावर १० दिवसांपर्यंत चालते आणि अँड्रॉइड आणि आयओएस या दोघांनाही सपोर्ट करते. स्मार्टवॉचसह ३६५ दिवसांची वॉरंटी देखील मिळते. ही वॉच फिटशॉटच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fitshot launch fitshot flair smartwatch for women check price and features ssb
First published on: 21-12-2022 at 16:03 IST