फ्लिपकार्ट ही एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे. दरम्यान खरेदीदारांना फ्लिपकार्टवर अनेक गोष्टी खरेदी करता येतात. तसेच त्यांना या गोष्टी खरेदी करत असताना आकर्षक ऑफर्स देखील मिळतो. दरम्यान फ्लिपकार्टने आपल्या दिवाळी सेलची घोषणा केली आहे. पुढील काही दिवस हे सणासुदीचा काळ आहे. त्यामुले फ्लिपकार्टने घोषणा केलेला सेल लवकरच सुरु होणार आहे. फ्लिपकार्टवरील हा सेल एकूण ९ दिवस सुरु राहणार आहे. या सेलमध्ये सणासुदीनिमित्त खरेदीदारांना खरेदीवर आकर्षक सूट देखील मिळू शकते. फ्लिपकार्टच्या या दिवाळी सेलबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आगामी फ्लिपकार्टचचा बिग दिवाळी सेल हा २ नोव्हेंबर म्हणजेच गुरुवारपासून सुरु होणार आहे. हा सेल २ तारखेला सुरु होणार असून ११ तारखेला संपणार आहे. खरेदीदारांनी खरेदी करताना एसबीआय बँकेच्या क्रेडिट कार्डने व्यवहार केल्यास त्यांना १० टक्के झटपट डिस्काउंट मिळू शकतो. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

हेही वाचा : Apple Event: M3 चिपसेटसह लॉन्च केले नवीन मॅकबुक प्रो व ‘हे’ मॉडेल; काय आहेत फीचर्स? किंमत…

फ्लिपकार्टचा आगामी बिग दिवाळी सेलदरम्यान, तुम्हाला अन्य प्रकारच्या इलेट्रॉनिक्सची उत्पादने कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. यामध्ये ७,९९९ रुपये किंमत असणाऱ्या रिअलमी टॅबलेटचा समावेश आहे. तसेच २,२९९ रुपये किंमत असणाऱ्या कॅनन,एचपी आणि अन्य ब्रॅंड्सच्या प्रिंटरचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फ्लिपकार्ट बिग दिवाळी सेलमध्ये आयफोन १४ वर आकर्षक सूट मिळू शकते. आयफोन १४ सेल दरम्यान (बँक डिस्काउंट ऑफर आणि अतिरिक्त एक्सचेंज डिस्काउंट) ४९,९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. तसेच आयफोन १२ व आयफोन १३ वर देखील फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये आकर्षक सूट मिळू शकते. तसेच फ्लिपकार्टच्या दिवाळी सेलमध्ये सोनी, निकॉन आणि कॅनन आणि अन्य कॅमेरा ब्रँड्सवर आकर्षक सूट मिळू शकते.