scorecardresearch

Premium

Apple Event: M3 चिपसेटसह लॉन्च केले नवीन मॅकबुक प्रो व ‘हे’ मॉडेल; काय आहेत फीचर्स? किंमत…

अ‍ॅपल आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन उत्पादने लॉन्च करत असते.

apple launch new macbook pro laptop and imack in india
लॉन्च झाली अ‍ॅपल मॅकबुक प्रो लॅपटॉपची नवीन लाइन अप (Image Credit- @theapplehub/X)

अ‍ॅपल ही एक दिग्गज टेक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सतत नवनवीन उत्पादने लॉन्च करत असते. अ‍ॅपल कंपनीने भारतात अधिक शक्तिशाली असणारे असे मॅकबुक प्रो लॅपटॉपची एक नवीन लाइन अप लॉन्च केली आहे. नवीन लॅपटॉपमध्ये एम ३ लाइन चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. ३ एनएम चिपसेटचा वापर लॅपटॉप आणि कॉम्प्युटरसाठी केला जातो. अ‍ॅपल कंपनीने २०२१ नंतर मॉडेल अपडेट करत एक नवीन आयमॅक देखील लॉन्च केला आहे. नवीन मॅकबुक प्रो मॉडेलमध्ये M3, M3 Pro आणि M3 Max चिपसेटचे पर्याय देण्यात आले आहेत. iMac मध्ये M3 चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. या नवीन उत्पादनाबद्दल अधिक जाणून घेऊयात.

iMac : किंमत आणि उपलब्धता

करता येणार आहेत. याच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ८-कोर सीपीयू, ८ जीबी मेमरी, २५६ जीबीची एसएसडी आणि दोन थंडरबोल्ट पोर्टचा समावेश आहे. तेच यामध्ये एक मॅजिक कीबोर्ड आणि मॅजिक माउस देखील येतो. १० कोर GPU असणाऱ्या आयमॅकची किंमत १,४४,९०० रुपये आहे. विद्यार्थ्यांसाठी याची किंमत १,४४,९०० रुपयांपासून सुरु होते. हे उत्पादन तुम्हाला हिरवा., पिवळा , नारंगी, गुलाबी, जांभळा, निळा आणि चांदी रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलमध्ये ८ -कोर सीपीयू, ८ जीबी मेमरी, एक २५६ जीबीचे एसएसडी, दोन थंडरबोल्ट पोर्ट, दोन अतिरिक्त यूएसबी ३ पोर्टचा समावेश आहे. यामध्ये एक मॅजिक कीबोर्ड येतो, जय्यमध्ये टच आयडी, एक मॅजिक माउस आणि गिगाबीट इथरनेटचा समावेश आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Airtel announces in flight roaming plans for prepaid postpaid users For Customers to stay connected while flying
विमान प्रवास करणाऱ्यांसाठी खुशखबर; Airtelने दिली ‘ही’ दमदार ऑफर
OnePlus Company teases new Watch 2 smartwatch launch at MWC 2024 likely called the OnePlus Watch 2
OnePlusची नवीन घोषणा! ‘Watch 2’ ची दाखवली पहिली झलक; होणार ‘या’ दिवशी लाँच
Amazon India Mega Electronics Days sale Start Deals on earbuds smartwatches and 10 per cent instant discount
ॲमेझॉन ‘Mega Electronics Days’ सेल सुरू; ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मिळणार आकर्षक सूट
Reliance Jio Offers Date Boosters Three Plans For Jio Air Fiber Users Provide High Speed Date Options
Jio AirFiber: जिओने लाँच केले ‘तीन’ डेटा बूस्टर प्लॅन्स! युजर्सना देणार १०००GB पर्यंत हायस्पीड इंटरनेट डेटा

हेही वाचा : ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन हवे आहे? BSNL कडे आहेत ‘हे’ भन्नाट प्लॅन्स, जाणून घ्या

३० ऑक्टोबर म्हणजे आजपासून तुम्ही नवीन २४ इंचाचा iMac हे उत्पादन M3 सह कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवरून ऑर्डर करू शकणार आहेत. हे उत्पादन अमेरिकेसह २७ देशांमध्ये उपलब्ध आहे. याची डिलिव्हरी ७ नोहेंबरपासून सुरु होणार आहे. याची विक्री कंपनीचे अधिकृत स्टोअर आणि अधिकृत विक्रेत्यांमार्फत केली जाणार आहे.

MacBook Pro M3 : भारतातील किंमत

M3 चिपसेटसह मॅकबुक प्रो ची किंमत १,६९,९०० रुपयांपासून सुरु होते. तर M3 Pro चिपसेटचा सपोर्ट असणाऱ्या १४ इंचाच्या मॅकबुक प्रो ची किंमत १,९९,९०० रुपयांपासून सुरु होते. M3 चिपसेटचा सपोर्ट असणाऱ्या १६ इंचाच्या मॅकबुक प्रो ची किंमत २,४९,९०० रुपयांपासून सुरु होते. ८ टीबी एसडी आणि १२८ जीबी रॅम असणाऱ्या सर्वात महाग १६ इंचाच्या मॅकबुक M3 Max ची किंमत ७,१९,९०० रुपये तर १४ इंचाच्या मॅकबुक M3 मॅक्सची किंमत ६,८९,९०० रुपये आहे.

ग्राहक आजपासून नवीन मॅकबुक प्रो apple.com/in/store किंवा Apple स्टोअरवरून ऑर्डर करू शकतात. ७ नोहेंबर पासून याची डिलिव्हरी मिळण्यास सुरुवात होणार आहे. याची विक्री कंपनीचे अधिकृत स्टोअर आणि अधिकृत विक्रेत्यांमार्फत केली जाणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Apple launch new mackbook pro laptops and imac m3 m3 pro m3 max check all price and features tmb 01

First published on: 31-10-2023 at 11:44 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×