फेसबुक आणि इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडियापासून तरुण मुलांचा विचार करून प्रायव्हसी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मेटा काही नवीन फीचर्सवर काम करीत आहे. इतकेच नव्हे, तर या माध्यमांवर तरुण काय कॉन्टेंट्स पाहतायत व काय सर्च करीत आहेत आणि त्यावर नियंत्रण ठेवणारी काही फीचर्स लॉंचही केली आहेत. त्यासोबतच आता मेटाने नाइटटाइम नज आणि पेरेंटल सुपरव्हिजन [Nighttime Nudge, Parental Supervision], अशी आणखी दोन फीचर्स आणली आहेत. काय आहेत ही दोन नवीन फीचर्स पाहा.

१. नाइटटाइम नज [Nighttime Nudge]

how eating onions included food in summer helps to beat the heatwaves
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी कांदा कसा ठरतो फायदेशीर; जाणून घ्या उन्हाळ्यात कांदा खाण्याचे फायदे
Surat Diamond Bourse
सूरत डायमंड बोर्सकडे हिरे व्यापाऱ्यांची पाठ; अनेकजण पुन्हा मुंबईत परतले, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो

तरुण मंडळी घरात असली तरीही तासन् तास फोन वा सोशल मीडियावर रील्स बघत, कुणाशी तरी चॅट करीत वेळ घालवत असतात. मात्र, हे सर्व रात्री-अपरात्रीही सुरू असते. त्यामुळे आवश्यक तितकी झोप मिळत नाही. असे होऊ नये आणि या तरुण पिढीला योग्य तेवढी झोप घेण्याची, वेळेवर झोपण्याची सवय लागावी या हेतूने, नाइटटाइम नज नावाचे एक फीचर आणले आहे. हे फीचर तरुण मंडळी रात्री उशिरापर्यंत फोन हाताळताना दर १० मिनिटांच्या अंतरांनी त्यांना किती वाजले आहेत हे दाखवून, लॉग आउट करण्याची आठवण करून देण्याचे काम करील, अशी माहिती इंडिया टुडेच्या एका लेखावरून मिळाली.

हेही वाचा : Samsung Galaxy S24, S24 Ultra, S24+ कोणता स्मार्टफोन सर्वोत्तम? जाणून घ्या

२. पेरेंटल सुपरव्हिजन [Parental Supervision]

मागच्या वर्षी मेटाने, पालकांसाठी पेरेंटल सुपरव्हिजन नावाचे एक फीचर लॉंच केले होते. या फीचरच्या मदतीने, पालक तरुणांच्या मेसेंजर अॅपची सर्व माहिती मिळवू शकतात. मात्र, मुलांनी केलेले कोणतेही मेसेज यामधून पालकांना पाहता येत नाहीत. त्यावरून केवळ आपली मुले किती वेळ फोनवर घालवतात हे ते पाहू शकतात आणि कॉन्टॅक्ट्सवरील अपडेट मिळवू शकतात. तसेच प्रायव्हसी सेटिंग्समध्ये बदल करू शकतात. हे टूल सुरुवातीला केवळ युनायटेट किंग्डम, अमेरिका व कॅनडामध्ये उपलब्ध होते. मात्र, आता ते संपूर्ण जगभरात, फेसबुक, इन्स्टाग्राम, मेसेंजर व होरायझन वर्ल्ड्ससाठी उपलब्ध होणार आहे.

पेरेंटल सुपरव्हिजनची मेसेंजरवरील फीचर्स काय आहेत ते पाहा

संबंधित अॅपचा वापर आपल्या मुलांनी किती वेळ केला आहे यावर लक्ष ठेवता येते.

आपली मुले कोणासोबत बोलत आहेत, त्यांच्या प्रायव्हसी सेटिंग्स आणि त्यामध्ये कोणत्याही केलेल्या बदलावर पालक लक्ष ठेवू शकतात.

जर मुलांनी एखाद्या व्यक्तीला मेसेंजरवर रिपोर्ट केले असल्यास, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. इतकेच नाही तर मुलांना तुम्ही अशा व्यक्तींपासून सुरक्षित ठेवू शकता. त्यांना मदत करू शकता.

तुमच्या मुलांना कोणती व्यक्ती मेसेज पाठवू शकते आणि कोण नाही यावर तुम्ही लक्ष आणि नियंत्रण ठेवू शकता.

मुले एखादी स्टोरी किंवा पोस्ट ऑनलाइन शेअर करीत असल्यास कोण ते पाहू शकते यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. तसेच आवश्यक असल्यास या सेटिंगमध्ये तुम्ही बदल करू शकता.

इन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेजसाठी फीचर्स

मेटाकडून तरुण मंडळींच्या सुरक्षेसाठी नवीन फीचर्सची तपासणी करण्यात येत आहे. त्यामध्ये तरुण मुले ज्या व्यक्तींना फॉलो करीत नाहीत, अशा व्यक्ती जर खासगी मेसेज पाठवत असतील, तर अशा संशयास्पद वापरकर्त्यांपासून १९ वर्षांखालील वापरकर्त्यांना सुरक्षित ठेवता यावे हा या नवीन फीचर्सचा हेतू आहे. त्यासोबतच अजून अनेक नवीन फीचर्सची चाचणी आणि तपासणी होत आहे.