मनोरंजनासाठी टॅबलेट हा चांगला पर्याय ठरू शकतो. मोठी स्क्रीन असल्याने ब्राउझिंग करण्याचा आणि चित्रपट पाहण्याचा वेगळाच आनंद मिळतो. तसेच टॅबवर तुम्हाला ऑफिसची किरकोळ कामे देखील करता येऊ शकते. जर तुम्हाला स्वस्त किंमतीत चांगला टॅबलेट हवा असेल तर Fusion 5 ४जी टॅब हा चांगला पर्याय ठरू शकतो. सध्या अमेझॉनवर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल एकस्ट्रा हॅपिनेस डे सेल सुरू आहे. या सेलमध्ये फ्युजन ५ जी टॅबवर ५३ टक्के डिस्काउंट मिळत आहे.

५३ टक्के डिस्काउंट नंतर ही आहे किंमत

फ्युजन ५ टॅबची किंमत १९ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, सेलमध्ये या टॅबवर ५३ टक्क्यांची सूट देण्यात आल्याने त्याची किंमत ९ हजार ४९९ रुपये झाली आहे. यासोबत तुम्ही ४९९ रुपयांचा अमेझॉन कुपन वापरू शकता. त्याचबरोबर तुम्ही हा टॅब इएमआयवर देखील खरेदी करू शकता. यासाठी तुम्हाला दर महिन्याला ४५४ रुपये द्यावे लागतील. टॅबवर एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये ८ हजार ७५० रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

(आता लाईनमध्ये लागण्याची गरज नाही, ‘या’ नव्या प्रणालीने सहज मिळेल रेल्वेचे अनारक्षित तिकीट)

हे आहेत फ्युजन ५ टॅबचे फीचर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

टॅबमध्ये ८ मेगापिक्सेलचा प्राइमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे. टॅबला १०.१ इंचची स्क्रिन देण्यात आली आहे. टॅबमध्ये १.३ गिगाहर्ट्झचे मीडियाटेक एआरएम कोर्टेक्स ए ५३ सीपीयू ६४ बीट प्रोसेसर देण्यात आले आहे. टॅबची स्टोअरेज १२८ जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच, टॅबमध्ये ५ हजार एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. टॅबसोबत एक वर्षाची वॉरंटी मिळते.