जीमेल हे पत्रव्यवहाराचे आधुनिक स्वरूप आहे. तसेच अनेक वेबसाईट्स आणि ॲप्समध्ये आपण जीमेलच्या माध्यमातून लॉगिन करतो. त्यामुळे त्यासर्व ॲप्स, वेबसाईटचे पासवर्ड, कामाचे लॉगइन आयडी, ऑफिसमधून शेअर करण्यात आलेले अधिकृत मेल अशी बरीच माहिती मेलमध्ये असते. पण जीमेल उघडल्यानंतर अनेकवेळा त्यामध्ये प्रमोशनल मेल, न्यूजलेटर अशा गोष्टींनी भरलेले दिसते. यामध्ये महत्त्वाचे मेल्स सापडत नाहीत किंवा स्किप होण्याची शक्यता असते. या समस्येवर फिल्टर हा पर्याय उपलब्ध आहे. कसे वापरायचे फिल्टर फीचर जाणून घ्या.

फिल्टर फीचर वापरण्याच्या सोप्या स्टेप्स

  • जीमेल इनबॉक्समध्ये वरच्या उजव्या बाजूला असणाऱ्या गिअर आयकॉनवर क्लिक करा.
  • डाउन मेन्युमधून ‘सेटिंग’ पर्याय निवडा.
  • सेटिंग पेजवर ‘फिल्टर अँड ब्लॉक्ड ऍड्रेस’ पर्याय निवडा.
  • ‘ऍड न्यू फिल्टर’ पर्याय निवडा.
  • त्यानंतर एक पॉप अप दिसेल त्यात ज्या मेल आयडी फिल्टर करायच्या आहेत त्या टाका.
  • त्यानंतर क्रिएट फिल्टर पर्याय निवडा.

अशाप्रकारे तुम्ही फील्टर पर्यायाचा वापर करू शकता. यासाह जर तुम्हाला एखाद्या मेल आयडीवरून सतत येणारे मेल्स ब्लॉक करायचे असतील, तर त्यासाठी कोणता पर्याय निवडावा जाणून घ्या.

Boiled Ajwain Water Benefits
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? 
31st August Panchang & Marathi Rashi Bhavishya
श्रावणी शनिवार, ३१ ऑगस्ट पंचांग: महिन्याचा शेवटच्या दिवशी ‘या’ राशींवर होईल महादेव, शनिदेवाची कृपा; अचानक धनलाभ तर कलेला मिळेल कौतुकाची थाप; वाचा तुमचे राशीभविष्य
Take care of your scooter
‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने घ्या तुमच्या स्कुटीची काळजी; मिळेल जास्त अ‍ॅव्हरेज
Car Driving Tips
चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेकिंग करणे पडेल महागात; ‘या’ टिप्स वाचून वेळीच व्हा सावध!
Tandalache Vade recipe in marathi
तांदुळ-नाचणीच्या पिठापासून बनवा कुरकुरीत वडे; ‘ही’ घ्या सोपी मराठी रेसिपी
Driving Licence | are you waiting for Driving Licence card, | how to use DigiLocker app
Driving License काढले पण कार्ड हातात आले नाही, मग गाडी चालवताना डिजिलॉकरचा करा वापर, RTO अधिकाऱ्याने दिली माहिती, पाहा VIDEO
Cholesterol and Diabetes
रोज किती तास झोपल्याने कोलेस्ट्रॉल अन् मधुमेहाचा धोका होईल कमी? संशोधनातून मोठा खुलासा
price, gold, gold rate, gold price in mumbai,
सोन्याचा दर देशभर एकच असू शकतो का? कसा?

आणखी वाचा: घरबसल्या मोबाईलवर मिळवा डिजिटल वोटर आयडी; कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या

अनसबस्क्राईब आणि मास रिपोर्ट

  • स्पॅम मेल्सपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही अशा मेल्सना अनसबस्क्राईब आणि मास रिपोर्ट करू शकता.
  • यासाठी जीमेलमध्ये लॉग इन करून स्पॅम मेल निवडा. यामध्ये कोणताही महत्त्वाचा मेल निवडला जाणार नाही याची खात्री बाळगा.
  • स्पॅम मेल निवडल्यानंतर ‘i’ आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर ‘ रिपोर्ट स्पॅम, रिपोर्ट स्पॅम अन सबस्क्राईब हे पर्याय दिसतील.
  • त्यानंतर एक लिस्ट दिसेल, यामध्ये महत्त्वाचे अकाउंट्स नसतील तर स्पॅम रिपोर्ट करून अनसबस्क्राईब पर्याय निवडा.
  • यानंतर या अकाउंट्सवरून तुम्हाला मेल येणार नाही.