तुम्ही एका दिवसात अनेक लोकांना ईमेल पाठवतात, विशेषतः जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल, तर तुम्ही Gmail आणि Outlook द्वारे दररोज डझनभर ईमेल रोज पाठवत असता. कधी कधी असंही होतं की तुम्ही एखाद्याला चुकीचा ईमेल पाठवला जातो किंवा ईमेल पाठवल्यानंतर तुमचा विचार बदलतो. अशावेळी एकदा पाठवलेला मेल कसा हटवावा हे समजत नाही काळजी करू नका अशा परिस्थिती तुम्ही जीमेलचे अनसेंड फीचर वापरू शकता.

पाठवलेला इमेल Undo किंवा Unsent करु शकता

खूप कमी लोकांना माहितीये की गुगल आपल्या Gmail यूजर्सला ठराविक कालावधीमध्ये असे ईमेल अनसेंड करण्याची परवानगी देते, जे तुम्ही चुकून पाठवले होते. आज आम्ही तुम्हाला Gmail वर ईमेल अनसेंड कसा करू शकता हे सांगणार आहोत.

विशेष म्हणजे, ईमेल पाठवल्यानंतर, तुम्हाला तो Undo करण्यासाठी फक्त थोडा वेळ मिळतो. जेव्हा तुम्ही ईमेल पाठवता तेव्हा तुम्हाला मेसेज पाठवल्याचा पर्याय दिसला असेल. येथे व्ह्यू मेसेजसह Undo चा पर्याय देखील आहे. तुमचा ईमेल पाठवणे रद्द करण्यासाठी, तुम्हाला Undo पर्यायावर क्लिक करावे लागेल. याशिवाय यूजर्सना हवे असल्यास ते कोणत्याही मेसेज undo करण्याची वेळ देखील निवडू शकतात.

This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
Sleeping At This Time Reduce Spike In Diabetes Type 2
मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी ‘या’ वेळी व ‘इतका’ वेळ झोपणं गरजेचं! खाणं-पिणं, व्यायामाशिवाय ‘ही’ चूक ठरते घातक
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

यूजर्स पाठवलेल्या मेसेजच्या नोटिफिकेशनच्या मदतीने Undo पर्यायावर टॅप करून काही सेकंदात ईमेल मागे घेऊ शकतात किंवा रद्द करू शकतात.

हेही वाचा – iPhone वरील कॅलेंडर अ‍ॅपमध्ये व्हॉट्सअ‍ॅप कॉल कसे शेड्यूल करायचे? ‘या’ आहेत सोप्या स्टेप्स

पाठवलेला ईमेल Undo किंवा Unsent कसा करायचा?

  • जीमेल युजर्स “message sent” अलर्टसह दिसेल
  • Sent Undo किंवा view the message हे पर्याय दिसतील
  • ईमेल रद्द करण्यासाठी undo वर क्लिक करा.
  • पण गुगल यूजर्सला जीमेलद्वारे पाठवलेला मेल परत मागे घेण्यासाठी काही ठराविक काळात संधी देते

हेही वाचा – अमेरिकेतील ‘ही’ कंपनी भारतात करणार तब्बल ३०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक

मेसेज undo किंवा रद्द करण्यासाठीची कालवधी कसा बदालायचा ते जाणून घ्या

जीमेल सेटिंग्ज(Gmail settings)

  • तुमच्या संगणकावर Gmail उघडा.
  • सेटिंग्जमध्ये जा.
  • तुम्हाला सामान्य सेटिंग्ज मेनूमध्ये ‘undo send’ पर्याय दिसेल.
  • टाईम रेंज बदला. तुम्ही ३० सेकंदांपर्यंत निवडू शकता.
  • बदल सेव्ह करा.

दरम्यान, Google ने नुकतेच AI-पॉवर्ड ‘help me write’ फिचर सादर केले आहे, जेव्हा सार्वजनिकरित्या उपलब्ध असेल, तेव्हा यूजर्सला ईमेलला रिप्लाय देण्याची परवानगी मिळेल. आता या टेक जायंटने जीमलेसाठी मेसज सेंट करणाऱ्याची ओळख तपासण्यासाठी ब्ल्यू चेकमार्क देण्याची घोषणी केली आहे.