Portable speakers under 5000 : पोर्टेबल स्पीकरमुळे कुठेही गाण्यांचा आनंद घेऊ शकता. दमदार आवाजात चित्रपट पाहू शकता. कारमध्ये किंवा कॅम्पिंग, सहलीतही तुम्ही मनोरंजनासाठी या स्पीकर्सचा वापर करू शकता. तुम्ही पोर्टेबल स्पीकर्स घेण्याचा विचार करत असाल तर काही पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर्स ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही प्लाटफॉर्म्सवर ५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध आहेत. कोणते आहेत हे स्पीकर्स? जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१) जेबीएल क्लिप ४

महागडे असले तरी JBL कंपनीचे स्पीकर्स हे दमदार आवाज आणि गुणवत्तेमुळे ओळखले जातात. JBL Clip 4 पोर्टेबल स्पीकर तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. या स्पिकरला लटकवण्यासाठी क्लिप देण्यात आली आहे. यासह हा स्पिकर वॉटर प्रुफ आणि डस्ट प्रुफ देखील आहे. बाहेर वापरण्यासाठी त्याचा वापर करता येऊ शकते. JBL Clip 4 पोर्टेबल स्पीकरची किंमत ४४९९ रुपये आहे.

(Reuse old smartphone : जुन्या फोनला बनवू शकता CCTV, आणखी कोणत्या कामासाठी वापरू शकता? जाणून घ्या)

२) ब्लॉपंक्ट अटॉमिक बीबी ३०

Blaupunkt Atomik BB30 स्पीकर पार्टीमध्ये वापरता येऊ शकते. पोर्टेबल असला तरी हा स्पीकर जबरदस्त आवाज बाहेर फेकतो. स्पीकर ५० वॉट साउंड आऊटपूट देतो. गाणी चालवताना त्यात आरजीबी लाइटिंग सुरू होते. हा स्पीकर ४ हजार २९० रुपयांमध्ये मिळतो.

३) मिव्ही रोम २

कमी किंमतीत चांगला ब्लूटूथ स्पीकर हवा असल्यास Mivi roam 2 चांगला पर्याय ठरू शकतो. हा पोर्टेबल स्पीकर वॉटर रेझिस्टंट असून त्यामध्ये इनबिल्ट माइक देण्यात आला आहे. त्यामुळे, कॉलवर असताना तुम्ही या स्पीकरवरून बोलू शकता. या स्पीकरची किंमत १ हजार ९९ रुपये आहे.

(नाविन्यपूर्ण डिजाईनमुळे लोकप्रिय झाले ‘हे’ 5 Smartphone, व्हिडिओ पाहून बनवणाऱ्याचे कराल कौतुक)

४) बोट स्टोन ६२०

boAt Stone 620 पोर्टेबल स्पीकर १२ वॉटचा साउंड आऊटपूट देतो. स्पीकरमध्ये टीडब्ल्यूएस फीचर देखील मिळते. तुम्ही दोन स्पीकर कनेक्ट करून गाणी ऐकू शकता. या ब्लूटूथ स्पीकरची किंमत केवळ १ हजार ९९९ रुपये आहे.

५) सोनी एसआरएस – एक्सबी १३

Sony SRS – XB 13 पोर्टेबल स्पीकर वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंट आहे. सिंगल चार्जवर हा स्पीकर तुम्ही ८ ते ९ तासांपर्यंत वापरू शकता. या स्पीकरची किंमत ३ हजार ६०० रुपये आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Good sound output portable speakers under 5000 ssb
First published on: 18-12-2022 at 17:23 IST