scorecardresearch

Premium

गुगल ‘Bard’ ला मिळाले मोठे अपडेट; आता फोटो अपलोड करण्यासह वापरकर्त्यांना ‘या’ ९ भारतीय भाषांमध्ये करता येणार चॅट

ChatGPT च्या तुलनेत Google Bard ला पॉइंटरमध्ये उत्तरे देणे आवडते.

Google Bard users upload photos
गुगल AI 'Bard' (फोटो-गुगल)

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ओपनएआय कंपनीने आपला ChtaGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. त्यापाठोपाठ गुगल मायक्रोसॉफ्टने देखील आपले चॅटबॉट स्पर्धेत उतरवले आहेत. गुगलने आपला Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे. बार्ड हे चॅटजीपीटीशी स्पर्धा करते. आता गुगलच्या बार्डला सर्वात मोठे अपडेट मिळणार आहे. वापरकर्ते आता AI चॅटबॉटशी ४० भाषांमध्ये संवाद साधू शकणार आहेत. ज्यामध्ये हिंदी, तमिळ, तेलुगु, बंगाली, कन्नड, मल्याळम, मराठी, गुजराती आणि उर्दू या नऊ भारतीय भाषांचा समावेश आहे. गुगल हे अपडेट ब्राझील आणि पूर्ण युरोपमध्ये देखील आणणार आहे.

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बार्ड आता प्रॉम्प्ट इमेज देखील समजू शकतो. या प्रकारची सुविधा चॅटजीपीटीच्या सबस्क्रिप्शन घेतलेल्या मेंबर्सना मिळते. तर दुसऱ्या बाजूला गुगल ही सुविधा मोफत देत आहे. मात्र ही मोफत सुविधा केवळ इंग्रजी भाषेमध्येच आहे. पहिल्यांदा गुगल I/O मध्ये घोषणा करण्यात आली की, गुगल आपल्या उपलब्ध AI टेक्नालॉजीने गुगल लेन्सची क्षमता बार्डमध्ये वाढवत आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

Honor 90 to be available discounted price on amazon great indian festival sale
Amazon Great Indian Festival Sale 2023: २०० मेगापिक्सलचा कॅमेरा असणाऱ्या Honor च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळणार ११ हजारांचा डिस्काउंट, ऑफर्स पाहाच
pharma companies doing well
Money Mantra: महिन्याच्या अखेरीस निफ्टी 19600च्या वर बंद; फार्मा कंपन्या तेजीत !
iPhone 14 Plus available at Rs 73,999
iPhone 14 Plus स्वस्तात खरेदी करण्याची संधी; ‘या’ ठिकाणी मिळतोय ३६ हजारांचा डिस्काउंट
moto edge40 neo launch in india
५० मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह भारतात लॉन्च झाला MoTo चा ‘हा’ भन्नाट स्मार्टफोन, किंमत आणि ऑफर्स एकदा पाहाच

हेही वाचा : Chandrayaan-3: चांद्रयान-३ चे थेट प्रक्षेपण नागरिकांना पाहण्यासाठी इस्रोकडून खास व्यवस्था; ‘या’ ठिकाणी करावी लागेल नोंदणी

इमेज प्रॉम्प्ट आजपासून सुरू होईल. एकदा हे सुरू झाल्यानंतर बार्डला वापरकर्त्यांना इमेज अपलोड करण्याची सुविधा देण्यासाठी सर्च बारवर एक कॅमेरा आयकॉन मिळेल. ही सुविधा इमेजला डिकोड करण्यासाठी उपयोगी पडू शकते. उदाहरणार्थ तुम्ही खाद्यपदार्थांचा समावेश असलेली प्रतिमा अपलोड केल्यास वापरकर्ते बार्डकडून कंटेंटचे विश्लेषण करण्यास आणि खाद्यपदार्थाची रेसिपी सुचवण्यास सांगू शकतात. बार्ड फोटोसह परिणाम देखील देऊ शकतो.

ChatGPT च्या तुलनेत Google Bard ला पॉइंटरमध्ये उत्तरे देणे आवडते, जे एकतर विस्तृत किंवा अधिक स्पष्ट असू शकते. Google Bard वापरकर्त्यांना थ्रेड पिन करू देत आहे. वापरकर्त्यांना बार्डसोबत चॅट ठेवणे उपयुक्त ठरू शकते. वापरकर्त्यांना साइडबारमध्ये पिन करणे, नाव बदलणे आणि अलीकडील संभाषणे निवडण्याचे पर्याय दिसतील.

गुगल बार्डचा वापर करणाऱ्यांसाठी एक नवीन फिचर जोडत आहे. AI चॅटबॉट आता कोडर्सना Google Colab व्यतिरिक्त Python कोड Replit मध्ये एक्सपोर्ट करण्याची परवानगी देतो. विशेष म्हणजे, बर्‍याच टेक कंपन्या इन-हाउस कोडर्सना बार्ड आणि चॅटजीपीटी सोबत तपशील शेअर करू नयेत असे आवाहन करत आहेत.Google वापरकर्त्यांना संवेदनशील माहिती Bard सोबत शेअर न करण्याची शिफारस देखील करते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google bard gets big update uplaod images and chat 9 indian and other languages tmb 01

First published on: 13-07-2023 at 16:27 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×