आपण सगळे जण इंटरनेटचा वापर करतो. आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती हवी असल्यास आपण Google वर शोधतो. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या गोष्टींची बरीच माहिती मिळते. गुगल हे सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. मात्र गुगलने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. तो मोठा निर्णय कोणता आहे हे जाणून घेऊयात.
गुगलने आपली इन अॅक्टिव्ह अकाउंट पॉलिसी अपडेट करण्याचा निर्णय घेतला आहे. गुगलच्या या निर्णयामुळे अनेकांना आपले गुगल अकाउंट बंद होणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. अपडेट पॉलिसीनुसार गुगल दोन वर्षांपासून जी अकाउंट्स वापरण्यात आलेली नाहीत ती अकाउंट्स डिलीट करण्याची घोषणा केली आहे. याबाबतचे वृत्त reuters ने दिले आहे. तुमचे गुगल अकाउंट अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी काय केले पाहिजे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
हेही वाचा : Google चा मोठा निर्णय! ‘ही’ अकाउंट्स होणार डिलीट, जाणून घ्या यात तुमचा समावेश नाही ना?
गुगल दोन वर्षांपासून साइन इन न केलेले अकाउंट्स डिलीट करणार आहे. पण गुगल फक्त अकाउंट डिलीट करणार नसून ज्यांनी डॉक्स, गुगल मीट , ड्रिव्ह आणि कॅलेंडर आणि गुगल फोटो व युट्युब ही अकाउंट वापरली नसतील तर ही अकाउंट्स देखील डिलीट करण्यात येणार आहेत. गुगलचे हे नवीन धोरण केवळ वैयक्तिक गुगल अकाउंट्सलाच लागू होणार आहे.
गुगल या वर्षीच्या शेवटी म्हणजेच डिसेंबरपासून इन अॅक्टिव्ह अकाउंट्स डिलीट करण्यास सुरुवात करणार आहे. जर का तुमचे गुगल अकाउंट असेल आणि तुम्ही त्याचा अनेक वर्षे वापरच केला नसेल तर तुम्ही त्याचा वापर करून तुमचे अकाउंट डिलीट होण्यापासून वाचवू शकता.
हेही वाचा : Vodafone-Idea लवकरच लॉन्च करू शकते ५ जी नेटवर्क, जाणून घ्या सविस्तर
तुमचे अकाऊंट अॅक्टिव्ह कसे ठेवायचे ?
गुगल अकाउंट सुरु ठेवण्य्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे तो म्हणजे किमान २ वर्षांमध्ये किमान एकदा तरी साइन इन करणे. तुम्ही गुगल किंवा त्याच्या इतर सेवांमध्ये साइन इन केले असल्यास तुमचे अकाउंट हे अॅक्टिव्ह आहे असे समजले जाते. त्यामुळे ते डिलीट होणार नाही. तसेच खालील गोष्टी करून देखील आपण आपले अकाउंट सुरु ठेवू शकतो.
१. ईमेल पाठवणे किंवा वाचणे.
२. गुगल ड्राइव्हचा वापर करणे.
३. युट्युबवर व्हिडीओ पाहणे.
४. गुगल प्ले स्टोअरवरून App डाउनलोड करणे.
५. गुगल सर्चचा वापर करणे.