आपल्याला हवी ती माहिती कधीही आणि कुठेही मिळते ती म्हणजे आपल्या सर्वांचे आवडते म्हणजे सर्च इंजिन गुगल. याच Tech giant Google ने वापरकर्त्यांना एक प्रश्न विचारला आहे. तो प्रश्न असा आहे की , २०२३ मधील त्यांचा गुगलवरील शोध काय असणार आहे? असा प्रश्न गुगलने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. लोकांनी सुद्धा गुगलच्या या प्रश्नाला व्यं, मजा आणि टीका करत अशा सर्वच प्रकारे मनोरंजक उत्तरे दिली आहेत. मग आपण आता पाहुयात गुगलच्या प्रश्नांवर लोकांनी कशाप्रकारे उत्तरे दिली आहेत.

ChatGPT – गुगलने विचारलेल्या प्रश्नावर बऱ्याच वापरकर्त्यानी २०२३ मधील गुगलवरील पहिले सर्च हे OpenAI चे ChatGPT याबद्दलचे असेल. एकूण आरोग्य कसे सुधारावे असे एका वापरकर्त्याने विचारले. त्रिम बुद्धिमत्ता (AI) चॅटबॉट या महिन्याच्या सुरुवातीला सादर करण्यात आला होता आणि तो Google साठी संभाव्य बदल समजला जात आहे की नाही हे वेळच ठरवेल.

Aadhaar तपशील ‘असा’ करा सुरक्षित, गैरवापर टाळण्यात होईल मदत

अनेक वापरकर्त्यांनी Google वर काम करण्याची तयारी दर्शविली. google वर entry levelची नोकरी कशी मिळवायची ? किंवा cloud engineer म्हणून google मध्ये कसे जायचे असे काही प्रश्न आहेत जे २०२३ मध्ये google वर शोधू असे सांगितले.अनेक जणांनी google च्या या प्रश्नाला उत्तर देताना ती उत्तरे मनोरंजनक , व्यंग किंवा टीका करत दिली. एकाने तर मी माझे जीवन de-Google करण्याचे काम करत आहे असे लिहिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

google च्या वापरकर्त्यानी Pixel tablet release date हे सर्च करणार असल्याचे लिहिले. तर काहींनी @Huawei and @google कधी पुन्हा एकत्र होतील आणि Samsung Galaxy S23 या विषयी सर्च करू असे सांगितले. एका google च्या वापरकर्त्याने तर ट्विटरचे पुढील सीईओ म्हणून एलोन मस्क कोणाची नियुक्ती करणार हे २०२३ मधील पहिले सर्च करणार असल्याचे सांगितले . ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.