scorecardresearch

Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत

गुगल मॅप्स आपोआप ऑफलाइन डाउनलोड केले जाऊ शकतात आणि तुमच्या वर्तमान स्थानावर आधारित अपडेट केले जाऊ शकतात.

Google-Maps offline
Google Maps चालणार इंटरनेटशिवाय; जाणून घ्या, नकाशे ऑफलाइन डाउनलोड करण्याची सोपी पद्धत (Jansatta File Photo)

गुगल मॅप्स हे जगातील सर्वात जास्त वापरल्या जाणार्‍या आणि अतिशय आवश्यक अ‍ॅप्सपैकी एक आहे. जेव्हा केव्हा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जावे लागते तेव्हा गुगलचे हे खास अ‍ॅप आपला आधार बनते. गुगल मॅप्स चालवण्यासाठी वापरकर्त्यांना इंटरनेट कनेक्शन आवश्यक आहे. पण गुगलच्या सपोर्ट पेजवर दिलेल्या माहितीनुसार, खराब इंटरनेट कनेक्शन असल्यास युजर्स गुगल मॅप ऑफलाइन देखील वापरू शकतात. गुगल मॅप्स आपोआप ऑफलाइन डाउनलोड केले जाऊ शकतात आणि तुमच्या वर्तमान स्थानावर आधारित अपडेट केले जाऊ शकतात.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की गुगल मॅप्स बिल्ट ऑफलाइन वैशिष्ट्य फक्त तुमच्या कारसाठी आहे. या वैशिष्ट्याची उपलब्धता किंवा कार्यक्षमता तुमच्या कारचा निर्माता, स्थान आणि डेटा प्लॅन यावर अवलंबून असते. याशिवाय, हे वैशिष्ट्य सध्या सर्वच देशांमध्ये उपलब्ध नाही. तुम्ही तुमच्या गुगल मॅप्स ऑफलाइनने समाविष्ट केलेल्या क्षेत्राबाहेर गेल्यास, तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे माहिती मिळेल. याशिवाय, तुम्ही गुगल मॅप्सला ऑफलाइन मॅप्स व्यवस्थापित करण्याची परवानगी देखील देऊ शकता.

गुगल मॅप्स, कारमधील सेफ्टीशी निगडित रोड साइन इंटिग्रेशन आणि अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल सपोर्ट या ड्रायव्हर असिस्टंट फीचरच्या सपोर्टसाठी वाहन नकाशा सेवा (VMS) द्वारे डेटा पुरवतो. ही सुरक्षा वैशिष्ट्ये ऑफलाइन मॅप डेटावर अवलंबून असतात. तुमच्या प्रायव्हसी सेंटरवर जा आणि ऑटो डाउनलोड चालू करा जेणेकरून मॅप डेटा नेहमी उपलब्ध असेल.

प्रायव्हसी सेंटरमध्ये ऑटो-डाउनलोड कसे सुरु करावे?

  • गुगल मॅप्स उघडा आणि तळाशी दर्शविलेल्या सेटिंग्जवर टॅप करा.
  • यानंतर, प्रायव्हसी सेंटरवर जा आणि ऑफलाइन मॅप्सवर जा. येथे ऑटो-डाउनलोड ऑफलाइन मॅप्स हा पर्याय निवडा.
  • तुमच्याकडे सक्रिय इंटरनेट कनेक्शन असल्याची खात्री करा आणि ऑफलाइन मॅप डाउनलोड होण्याची वाट पहा.
  • ऑटो-डाउनलोड बंद केले तरी आधीच डाउनलोड केलेले मॅप्स जतन केले जातील. परंतु कोणतेही नवीन मॅप्स आपोआप डाउनलोड होणार नाहीत.

ऑफलाइन नकाशे कसे व्यवस्थापित करावे

  • तुम्ही ऑटो डाऊनलोड केलेले चालू केले असल्यास, तुमच्या कारमधील ऑफलाइन मॅपमध्ये गेल्यावर तुम्हाला तुमच्या कारच्या हालचालीवर आधारित ऑफलाइन मॅप्स दिसू लागतील.
  • तुम्ही साइन इन केले असल्यास घर आणि कामाचे मॅप्स व्यवस्थापित करू शकता.
  • याशिवाय तुम्ही मॅन्युअली मॅप डाउनलोड करू शकता.
  • हे लक्षात घेण्यासारखे आहे की घर आणि कार्यालयाचे नकाशे तुमच्या घराच्या आणि कार्यालयाच्या पत्त्यावर किंवा तुमच्या गुगल खात्याच्या लोकेशन हिस्ट्रीच्या आधारावर सेव्ह केले जातात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Google maps will run without internet learn the easy way to download maps offline pvp

ताज्या बातम्या