scorecardresearch

कॅमेरा टेस्टचा धक्कादायक निकाल, ‘या’ फोनने IPhone 14 Pro आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला पछाडले

Google Pixel 6a Camera Test : बेस्ट कॅमेरा स्मार्टफोनबाबत चर्चा होते तेव्हा Apple IPhone आणि सॅमसंग गॅलक्सीची आवर्जून चर्चा होते. परंतु, एका ब्लाइंड कॅमेरा चाचणीत या दोन्ही फोनला पछाडत दुसऱ्यात प्रिमियम फोनने बाजी मारल्याचे समोर आले आहे.

कॅमेरा टेस्टचा धक्कादायक निकाल, ‘या’ फोनने IPhone 14 Pro आणि Galaxy S22 Ultra स्मार्टफोनला पछाडले
(Image credit: Nandagopal Rajan/Indian Express)

Google Pixel 6a Camera Test : बेस्ट कॅमेरा स्मार्टफोनबाबत चर्चा होते तेव्हा Apple IPhone आणि सॅमसंग गॅलक्सीची आवर्जून चर्चा होते. परंतु, एका ब्लाइंड कॅमेरा चाचणीत या दोन्ही फोनला पछाडत दुसऱ्यात प्रिमियम फोनने बाजी मारल्याचे समोर आले आहे. मार्कस ब्राउनलीद्वारा आयोजित ब्लाइंड कॅमेरा चाचणीत Pixel 6a स्मार्टफोनने iPhone 14 Pro आणि Samsung Galaxy S22 Ultra या महागड्या फोनला हरवल्याचे समोर आले आहे. दोन्ही कंपन्यांकडून आधुनिक कॅमेरे देण्याचा दावा केला जातो. या पार्श्वभूमीवर या चाचणीचे परिणाम धक्कादायक आहेत.

(आता व्हॉट्सअ‍ॅपवरूनही बुक करू शकता Uber Cab, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)

ब्लाइंड कॅमेरा चाचणीत पिक्सेल ६ ए स्मार्टफोनने ‘बेस्ट ओव्हरऑल कॅटेगरी फॉर २०२२’ मध्ये पहिले स्थान पटकविले, तर पिक्सेल ७ ला ‘बेस्ट पोर्ट्रेट’ कॅमेरा फोनसाठी बॅज मिळाला. पिक्सेल ए सिरीज फोनने ‘बेस्ट लो लाइट कॅटेगरी’मध्ये दुसरे स्थान पटकवले. विशेष म्हणजे , काही कॅमेरा श्रेणींमध्ये गुगलचा पिक्सेल ७ देखील कमी किंमतीच्या पिक्सेल ६ ए पेक्षा चांगली कामगिरी करू शकला नाही. ‘बेस्ट ओव्हरऑल’मध्ये ७ प्रो स्मार्टफोने दुसरे स्थान मिळवले, तर सॅमसंग गॅलक्सी एस २२ स्मार्टफोनने पाचवे स्थान मिळवले. आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे अ‍ॅपल आयफोन १४ हे सॅमसंगपेक्षा दोन स्थान खाली आहे.

दरवर्षी यूट्यूबर अनेक लोकप्रिय फोन्सच्या कॅमेरा कार्यप्रदर्शनाची तुलना करतो आणि युजर्सना सर्वोत्तम फोनसाठी मत देण्याचे आवाहन करतो. ही चाचणी एका संकेतस्थळावर करण्यात आली होती आणि स्मार्टफोन्सचे नाव गुप्त ठेवण्यात आले होते जेणेकरून युजर्सनी नाव किंवा त्यांच्या किंमतीवरून नव्हे तर निकालावर आधारित फोटो निवडावा. उपकरणांना विविध सर्वोत्तम कॅमेरा श्रेणींमध्ये ठेवण्यासाठी इएलओ रेटिंग प्रणाली वापरली गेली.

(सिंगल चार्जवर १४ दिवस चालतो, जाणून घ्या ‘Honor Band 7’ची वैशिट्ये आणि किंमत)

चाचणीमध्ये आयफोन १४ प्रो, मोटो एज ३० अल्ट्रा, नथिंग फोन (१), वनप्लस १० प्रो, ओप्पो फाइंड एक्स ५ प्रो, गुगल पिक्सेल ६ ए, रिअलमी १० प्रो प्लस, असूस रोग फोन ६ आणि इतर स्मार्टफोन्सचा समावेश होता.

पिक्सेल ६ ए किंमत

Pixel 6a स्मार्टफोन या वर्षी ४३ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीमध्ये लाँच झाला होता. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून २९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Pixel 6a ५जी फोन असून ज्यांना उत्तम कॅमेरा फोन हवा आहे त्यांच्यासाठी हा फोन चांगला पर्याय ठरू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 12:32 IST

संबंधित बातम्या