Google चे स्मार्टफोन्स आता भारतातील ५जी नेटवर्कला सपोर्ट करणार आहेत. ५ जी नेटवर्क सक्षम करण्यासाठी कंपनीने एक अपडेट आणणे आवश्यक होते. मात्र त्याला काही कारणांमुळे उशीर झाला आहे. ज्या युजर्सनी त्यांच्या Google Pixel ६ आणि Google Pixel ७ या सिरीजमधील स्मार्टफोन्सवर अँड्रॉइड १२ QPR2 Beta 2 हे अपडेट केले आहे. त्या युजर्सना जिओ आणि एअरटेल या दोन्ही नेटवर्कची ५जी कनेक्क्टिव्हिटी सपोर्ट करणार आहे.

भारतात ५जी नेटवर्कला सपोर्ट करणारे Google Pixel स्मार्टफोन

Google Pixel 6a, Pixel 7, आणि Pixel 7 Proहे तीन स्मार्टफोन्स भारतात ५जी नेटवर्कला सपोर्ट करतात. पिक्सल ६ या स्मार्टफोन्स हे टेन्सर प्रोसेसरद्वारे संलग्न आहेत. तर पिक्सल ७ आणि पिक्सल ७ प्रो टेन्सर जी २ या प्रोसेसरवर आधारित आहेत. युजर्स आता ५जी नेटवर्कचा आनंद घेऊ शकतात. पिक्सल ६a हा गुगलचा स्मार्टफोन ५जी नेटवर्कचा सर्वात जास्त परवडणारा फोन आहे.

हेही वाचा : नवीन वर्षात iPhone अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिक्सल ७ आणि पिक्सल ७ प्रो हे स्मार्टफोन्स ५जी ब्रॅण्डला सपोर्ट करतात. Google Pixel स्मार्टफोनपैकी कोणताही स्मार्टफोन भारतात mmWave 5G बँडला सपोर्ट करत नाही, युजर्स हे पिक्सल ६a , पिक्सल ७ आणि पिक्सल ७ प्रो या स्मार्टफोन्सवर बीटा अपडेट करून ५ जी नेटवर्क वापरू शकतात.