scorecardresearch

नवीन वर्षात iPhone अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती

iPhone Discount Offers: भारतात iPhone ची मागणी दिवसेंदिवस वाढतेच आहे. अशातच तुम्हाला तुमचा आवडता iPhone स्वस्तात खरेदी करता येणार आहे.

नवीन वर्षात iPhone अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी; जाणून घ्या सविस्तर माहिती
Apple iPhone 12 अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करण्याची सुवर्णसंधी. (फोटो-संग्रहित छायाचित्र)

iPhone Discount Offers: आयफोन हा जगातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये आयफोनला (iPhone) मोठी मागणी देखील आहे. जबरदस्त लूक, स्पेसिफिकेशन्स, सिक्युरिटी फीचर्समुळे ॲप्पल आयफोनची किंमत देखील तेवढीच महाग आहे. त्यामुळे पैशांअभावी अनेक जण हा महागडा स्मार्टफोन खरेदी करु शकत नाहीत. परंतु आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. Apple iPhone 12 वर जबरदस्त ऑफर दिली जात आहे. या ऑफरअंतर्गत तुम्ही हा फोन अर्ध्या पेक्षा कमी किमतीमध्ये खरेदी करू शकणार आहात. चला तर जाणून घेऊया कुठे मिळतेय हा भन्नाट ऑफर.

‘येथे’ खरेदी करा स्वस्तात Apple iPhone 12

iPhone 12 5G जर तुम्ही ते विकत घेतले तर तुम्हाला त्यावर सुमारे ३३ हजार रुपयांची सूट मिळू शकते, परंतु फ्लिपकार्टवरून डिस्काउंट मिळवण्यासाठी तुम्हाला काही युक्त्या वापराव्या लागतील. iPhone 12 (ब्लॅक, १२८ GB) ची किंमत ६४,९०० रुपये आहे आणि तुम्ही १० टक्के सवलतीनंतर हा iPhone ५७,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तुम्ही एक्सचेंज ऑफरसहही फोन सहज खरेदी करू शकता.

(हे ही वाचा : खुशखबर! 5 हजार एमएच बॅटरीचा 5G स्मार्टफोन अवघ्या 599 रुपयांमध्ये खरेदी करता येणार, पाहा ऑफर )

या ऑफर अंतर्गत तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळत आहे. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर परत केल्यावर तुम्हाला २३ हजार रुपयांची वेगळी सूट मिळू शकते. निवडक स्मार्टफोन्सवर तुम्हाला ३,००० रुपयांची सूट मिळू शकते. तुम्हाला कंपनीकडून फोनवर एक वर्षाची वॉरंटी देखील मिळत आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-01-2023 at 21:52 IST

संबंधित बातम्या