गूगलने ‘मेड बाय गूगल इव्हेंटमध्ये ‘गूगल पिक्सेल ७’ आणि ‘पिक्सेल ७ प्रो’ बरोबर ‘गूगल पिक्सल वॉच’ लाँच करण्यात आले. यासह अनेक प्रोडक्ट्स लाँच करण्यात आले. या प्रॉडक्ट्सची माहिती गूगलकडुन आधीच जाहीर करण्यात आली होती. हे सर्व प्रोडक्ट GoogleStore.com वर उपलब्ध आहेत. यामधील स्मार्टवॉच ग्राहकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. या स्मार्टवॉचची किंमत आणि फीचर्स जाणून घ्या.

किंमत
या स्मार्टवॉचची किंमत ब्लुतुथ व्हेरियंटसाठी २८,६०० रूपये आणि एलटीइ व्हेरियंटसाठी ३२,७०० रुपये आहे. ६ ऑक्टोबरपासून काही देशांमध्ये या स्मार्टवॉचचे प्री-ऑर्डर सुरू करण्यात आले आहे.

फीचर्स

  • ‘गूगल पिक्सेल वॉच’मध्ये क्वीक पेअरिंग आणि इसीजी ट्रॅकिंग फीचर उपलब्ध आहे.
  • या स्मार्टवॉचमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे.
  • हे स्मार्टवॉच ५ एटीएम वॉटर रेजिसस्टंट आहे.
  • यासह ६ महिन्यांचे फिटबिटचे सब्सक्रीप्शन देण्यात आले आहे.
  • यामध्ये इमर्जन्सी मोड देखील उपलब्ध आहे.
  • हार्ट रेट ट्रॅकिंग, स्लिप मॉनिटरिंग यांसारखे महत्वाचे फीचर्स देखील या स्मार्टवॉचमध्ये उपलब्ध आहेत.