Google removed over 3,500 personal loan apps in India: गुगलने मागच्या वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये भारतातील ३,५०० पर्सनल लोन अ‍ॅप्स Google play store मधून हटवले. कंपनीद्वारे प्रस्थापित करण्यात आलेल्या Play Policy चे उल्लंघन केल्याने गुगलने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. गुगलच्या Play Product Report या अहवालाच्या माध्यमातून माहिती समोर आली आहे.

प्रत्येक अँड्रॉइड डिवाइसमध्ये गुगलच्या Google Play Protect अंतर्गत एक विशिष्ट फीचर जोडलेले आहे. हे फीचर मोबाइल फोनमधील सर्व अ‍ॅप्स स्कॅन करते आणि धोकादायक अ‍ॅप्सची माहिती यूजरपर्यंत पोहचवते. ग्राहकांचे नुकसान होईल अशा अ‍ॅप्लिकेशन्सपासून त्यांना सावध करण्याचे काम गुगलचे हे फीचर करते.

२०२१ मध्ये गुगलने हे फीचर अपग्रेड करताना फायनान्शियल सर्व्हिस अ‍ॅप्स (Financial Services Apps) यांच्यासाठी Play store developer program policy मध्ये नवे बदल केले होते. त्यानंतर २०२२ मध्ये NBFC आणि बँकांच्या वतीने देशात वैयक्तिक कर्ज देणाऱ्या डेव्हलपिंग अ‍ॅप्सवर काही अटी लागू केल्या होत्या. गुगलने पर्सनल लोन देणाऱ्या अ‍ॅप्सच्या डिस्क्रिप्शनमध्ये NBFC आणि बँका अशा सर्व भागीदारांच्या नावांचा खुलासा करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. शिवाय या भागीदार संस्थांच्या वेबसाइट्स अधिकृत एजंट म्हणून सूचीबद्ध असलेल्या अ‍ॅक्टिव्ह URL ची माहिती देण्याची नियम गुगलद्वारे तयार करण्यात आला होता.

आणखी वाचा – ट्विटरने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेचं खातं केलं लॉक, काय आहे नेमकं कारण? जाणून घ्या

गुगलने १.४३ मिलियन अ‍ॅप्स ब्लॉक केले.

मागच्या वर्षी म्हणजे २०२२ मध्ये प्ले स्टोअर डेव्हलपर प्रोग्राम पॉलिसी अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याने गुगलने जगभरातील १.४३ अ‍ॅप्स प्ले स्टोअरवरुन हटवले. यामध्ये भारतातील ३,५०० पर्सनल लोन अ‍ॅप्सचा समावेश आहे. ग्राहकांच्या माहितीची सुरक्षितता आणि नियमांचे उल्लघंन ही कारणे देत गुगलने हा निर्णय घेतला.