Google Flights ने एक नवी सुविधा आहे, जो हवाई वाहतूकीवर पैसे वाचवणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. Google ने एक नवीन फीचर लाँच केले आहे, त्याच नाव इनसाइट्स आहे, जे अधिकृतपणे सोमवारी सकाळी एका ब्लॉग पोस्टद्वारे घोषित करण्यात आले. हे फिचर उड्डाणाच्या एक महिनाआधी किंवा डिपार्चर होण्याच्या काही तास आधी तुम्हाला फ्लाइट बुक करण्याची योग्य वेळ कोणती आहे याची माहिती देते. पण या फिचरचे अजून टेस्टिंग सुरू आहे लवकरच ते जगभरातील यूजर्ससाठी उपलब्ध होईल.

याशिवाय, कंपनी Google Flights मध्ये हिस्टोरिकल ट्रेंड आणि डेटा देखील जोडत आहे, ज्याच्या मदतीने प्रवाशांनी निवडलेल्या तारखेसाठी आणि डेस्टिशनसाठी तिकीटाची किंमत कधी स्वस्त असेल हे जाणून घेण्यास सक्षम असेल. गुगल फ्लाइट्सचे हे नवीन वैशिष्ट्य प्रवाशांना फ्लाइट तिकीट बुक करण्यासाठी सर्वोत्तम वेळ कधी आहे हे देखील सांगेल.

हेही वाचा – Reliance Jio ने ‘या’ कारणासाठी बंद केला ११९ रूपयांचा प्लॅन, स्वस्त प्लॅनसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रूपये

“विश्वसनीय ट्रेंड डेटासह शोधांसाठी, तुमच्या निवडलेल्या तारखा आणि डेस्टिनेशन बुक करण्यासाठी किमती सामान्यत: सर्वात कमी कधी असतात ते तुम्ही आता पाहू शकता,” असे Google ने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे.

याशिवाय, जर तुम्ही Google Flights मध्ये किंमत ट्रॅकिंगची प्रणाली चालू केली. त्यामुळे गुगल फ्लाइटचे हे फिचर फ्लाइट तिकिटाची किंमत कमी होताच तुम्हाला नोटिफिकेशन पाठवेल. Google Flights च्या मदतीने, तुम्ही विशिष्ट दिवस किंवा तारखेसाठी किंमत ट्रॅकिंग सिस्टम चालू करू शकता. परंतु, हे फिचर वापरण्यासाठी, तुम्हाला Google मध्ये साइन इन देखील करावे लागेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Google Flights मध्ये, तुम्हाला अनेक फ्लाइट रिझल्टमध्ये रंगीत बॅज दिसतील. हे तुम्ही सध्या पाहत असलेले भाड्यासाठी नोटीफिकेशन पाठवले. प्रस्थानाच्या वेळीही ते असेच होईल. तुम्ही यापैकी कोणतीही फ्लाइट बुक केल्यास, Google Flights वैशिष्ट्य दररोज उड्डाण करण्यापूर्वी किंमतीचे निरीक्षण करेल. फ्लाइटची किंमत कमी असल्यास, Google तुम्हाला Google Pay द्वारे कमी केलेले भाडे परत करेल.