नॅशनल इंटरनेट एक्स्चेंज ऑफ इंडिया (Nixi), भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयासोबत काम करणारी एक ना-नफा कंपनीने प्रजासत्ताक दिनाच्या विशेष प्रसंगी खास ऑफर जाहीर केल्या आहेत. निक्सीने म्हटले आहे की वापरकर्ते .in डोमेन मोफत बुक करू शकणार आहेत.

.in या डोमेनचा वापर ईमेल , वेबसाईट्स आणि इतर अनेक अ‍ॅप्ससाठी केला जाऊ शकतो. सध्या निक्सीची सेवा ३० लाखांपासून अधिक वापरकर्ते वापरतात. तुम्ही या ऑफरमुळे Nixi सह .bharat डोमेन देखील बुक करू शकता. तब्बल २२ भाषांमध्ये डोमेनचे बुकिंग करू शकता.

हेही वाचा : Whatsapp Storage: व्हाट्सअँपचे स्टोरेज फुल झाले आहे? ‘या’ सोप्या पद्धतीचा करा वापर अन्…

देशाच्या ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त २९ जानेवारीपर्यंत (आज) .in हे डोमेन मोफत बुक केले जाऊ शकते असे nixi ने सांगितले. डोमेनच्या बुकिंगसोबत वापरकर्ते १० जीबी डेटा आणि त्या सोबत एक पर्सनल ईमेल आयडी मोफत मिळवू शकतात. या कालावधीत बुक केलेले डोमेन पहिल्या तीन महिन्यांसाठी विनामूल्य असतील.

या ऑफरची घोषणा करताना nixi चे सीईओ अनिल कुमार जैन म्हणाले , भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारत वेगाने डिजिटलीकरणाकडे वाटचाल करत आहे. देशवासियांना डिजिटल उपक्रमांचा अवल्माब करण्यासाठी जेव्हा भारताने G-20 चे अध्यक्षपद स्वीकारते तर nixi देखील सुरक्षित आणि व्यक्तिगत ईमेलसोबत डोमेनच्या शक्तीला सोबत घेऊन नागरिकांना सक्षम करून भारतात इंटरनेटची पायाभटू सुविधा रमण करण्यासाठी वचनबद्ध आहे.

हेही वाचा : ChatGPT वरून Amazon चा कर्मचाऱ्यांना इशारा; म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच आयआयटी मद्रासने BharOS लाँच कलेले आहे. जे google च्या Android OS शी थेट स्पर्धा करत आहे. BharOS ची रचना गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात घेऊन करण्यात आली आहे. भारत सरकारने या मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीमला निधी दिला आहे आणि ही एक ओपन सोर्स ऑपरेटिंग सिस्टीम आहे.