scorecardresearch

Premium

डिसेंबरच्या ‘या’ तारखेला GTA 6 चा ट्रेलर येणार… ग्रँड थेफ्ट ऑटो ६ गेमच्या रिलीजची तारीख आणि त्यामध्ये कोणते नवीन बदल होणार ते पाहा

GTA ग्रँड थेफ्ट ऑटोचा पहिला अधिकृत ट्रेलर डिसेंबरमध्ये महिन्यात येणार असून या गेममध्ये अमेरिकेतील ‘या’ गुन्हेगारांपासून प्रेरित असे एक जोडपे असण्याचीदेखील शक्यता आहे.

Grand theft auto 6 trailer release date
GTA ग्रँड थेफ्ट ऑटोचा पहिला अधिकृत ट्रेलर डिसेंबरमध्ये महिन्यात येणार. [photo credit – Indian express]

रॉकस्टार गेम्सने नुकतेच जीटीए ६ चा पहिला अधिकृत ट्रेलर ५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले आहे. यासोबतच त्यांनी शेअर केलेल्या जीटीए ६ च्या एका फोटोवरून कदाचित हा गेम अमेरिकेतील मायामी या शहराचे काल्पनिक व्हर्जन म्हणजेच व्हिन्स सिटी [Vice City] मध्ये सेट असल्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे.

या गेमिंग स्टुडिओने जीटीएबद्दलची सर्व माहिती अनेक वर्ष त्यांच्याकडे लपवून ठेवली असली, तरीही काही लीक झालेल्या फुटेजेसवरून आणि ऐकू येणाऱ्या अफवांवरून या गेमकडून कोणत्या अपेक्षा ठेऊ शकतो हे समजायला सोपे जाते, असे इंडियन एक्स्प्रेसच्या माहितीवरून समजते. जीटीए ६ हा गेम कसा असू शकतो, यातील गेमप्ले काय असेल आणि हा गेम कधी येणार याची सर्व माहिती पाहा.

kitchen jugaad stick bindi paper on gas cylinder
Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
maratha community marathi news, economically backward marathi news
मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता येणार नाही- उच्च न्यायालय
Eknath shinde devendra fadnavis 2
“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही”, लोकसभेच्या ‘त्या’ फॉर्म्युलावर शिंदे गट आक्रमक; म्हणाले, “आमच्याबरोबर दगाफटका…”
rohit pawar, baramati, lok sabha, supriya sule, sunetra pawar, ajit pawar, sharad pawar, maharashtra politics,
बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार नव्हे, ‘यांच्या’त होणार लढत, रोहित पवार यांचे मोठे विधान

जीटीए ६ चे लोकेशन आणि गेमप्ले

या गेममध्ये नवीन काय आहे याबद्दल माहिती कमी असताना, जीटीएफोरम्स [GTAForums] नावाच्या वापरकर्त्याने पोस्ट केलेल्या जवळपास ९० व्हिडीओमधून जीटीए ६ कसे दिसू शकते, त्याचा गेमप्ले काय असू शकतो, त्यामध्ये कोणते मॅप्स असतील आणि नॉन प्लेअर कॅरेक्टर्स [NPC non-playable characters] यांच्याबद्दल थोडीफार कल्पना या लीक फुटेजमधून येऊ शकते.

हेही वाचा : इन्स्टाग्रामवर एकापेक्षा अधिक अकाऊंट अॅड आणि स्विच कसे करायचे? तुम्हाला हा प्रश्न पडला असेल, तर लक्षात घ्या या सोप्या टिप्स…

या सर्व अफवांवर रॉकस्टारने पहिल्यांदाच जीटीए ६ या गेममध्ये स्त्री पात्र नायकाच्या भूमिकेत असणार असल्याची पुष्टी देत स्टेटमेंट दिले आहे. लीक झालेल्या गेम फुटेजमध्ये अजूनही काही विशेष दिसले आहे. ते म्हणजे, लुसिया आणि जेसन नावाचे जोडपे. हे जोडपे बऱ्यापैकी अमेरिकेतील बॉनी आणि क्लाईड [Bonnie and Clyde] नावाच्या गुन्हेगारांसारखे दिसणारे होते. त्यामुळे हे नवीन कॅरेक्टर्स आहेत की काय याबद्दलदेखील चर्चा होत आहे.

कंपनीने शेअर केलेल्या जीटीए ६ च्या फोटोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळील शहर पाहायला मिळत असल्याने, हा गेम अमेरिकेतील मायामीचे या शहराचे काल्पनिक व्हर्जन, म्हणजेच व्हिन्स सिटी [Vice City] मध्ये असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासोबतच ब्लूमबर्ग [Bloomberg] च्या अहवालानुसार, ‘कदाचित गेमच्या लॉन्चनंतर गेमचे डेव्हलपर्स गेममध्ये सतत, विविध शहरे वाढवून आणि इंटिरियरमध्ये बदल करून प्लेअर्स उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत प्रवास करण्यासाठी सक्षम असू शकतात’, असे समजते.

जीटीए ६ रिलीज कधी होणार?

सध्यातरी, रॉकस्टार गेम्सने जीटीए ६ च्या रिलीज तारखेबद्दल किंवा तो कधी रिलीज होणार याबद्दल काहीही सांगितलेले नाहीये. परंतु, या गेमिंग स्टुडियोच्या मुख्य कंपनीचा म्हणजे, टेक-टू इंटरॅक्टिव्हकडे [Take-Two Interactive] आणि कंपनीच्या सीईओ स्ट्राउस झेलेनिक [Strauss Zelnick] यांचे “आम्ही ऑपरेटिंग परफॉर्मन्सच्या नवीन रेकॉर्डचा विचार करत आहोत” या विधानाकडे पाहता, जीटीए ६ हा गेम २०२५ मध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परंतु, टेक जायंटच्या माहितीनुसार, “अतिशय लोकप्रिय असा, ग्रँड थेफ्ट ऑटो ६ म्हणजेच जीटीए ६ हा गेम २०२४ मध्ये रिलीज होण्याची अपेक्षा आहे”, असेदेखील समजते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Grand theft auto 6 first official trailer will release in december 2023 know more about date and game play dha

First published on: 04-12-2023 at 21:14 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×