GTA 6 to become worlds first game with AAAA label : ग्रँड थेफ्ट ऑटो ६ (GTA 6) या गेमच्या रिलीजची जगभरातील चाहते अगदी आतुरतेने वाट पाहात आहेत. या गेमच्या रिलीजच्या पार्श्वभूमीवर ब्लॉकबस्टर व्हिडीओ गेम्सच्या वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सामान्यत: मोठे बजेट, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विस्तृत मार्केटिंग कॅम्पेन्स असलेल्या गेम्ससाठी ‘एएए’ (AAA) हे लेबल वापरले जाते. मात्र डेव्होलव्हर डिजिटलचे सह-संस्थापक नायजेल लोवरी (Nigel Lowrie) यांनी रॉक्सस्टार गेम्सचा जीटीए फ्रँचाइजीमधील हा नवीन गेम त्या व्याख्येच्या पलिकडचा असून त्याला खऱ्या अर्थाने पहिला ‘एएएएए’ (AAAAA) गेम म्हटले गेले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यामुळे याबद्दल इंडस्ट्रीमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत

हाय-बजेट असलेल्या आणि मायक्रोसॉफ्ट, युबिसॉफ्ट, इए, सोनी आणि टेक-टू इंटरॅक्टिव्ह यासारख्या मोठ्या कंपन्यांकडून डेव्हलप करण्यात आलेल्या हाय-प्रोफाइल गेम्ससाठी कित्येक वर्षांपासून ‘एएए’ हे लेबल वापरले जात आहे. अशा प्रोजेक्टमध्ये साधारणपणे शेकडो डेव्हपर्स, दीर्घकाळ चाललेले प्रॉडक्शन आणि मोठ्या प्रमोशनल कॅम्पेनचा समावेश असतो. यापूर्वी युबिसॉफ्टने २०२४ मध्ये एक प्रयोग केला होता, त्यांनी त्यांच्या स्कल अँड बोन्स या लाइव्ह-सर्व्हिससाठी ‘एएएए’ या लेबवचा वापर केला होता, पण याचे लाँच तेवढे जोरदार न झाल्याने नंतर त्यांच्यावर टीका करण्यात आली होती.

GTA 6 ला ‘AAAA’ का म्हटले जात आहे?

लोअरी यांच्या मते जीटीए ६ हा गेम ब्लॉकबस्टर्सच्या तुलनेत वेगळ्या पातळीवरील आहे. त्यांनी नमूद केले की ही फ्रँचायझीचे सांस्कृतिक महत्त्व आणि मार्केटवरील प्रभाव हा अतुलनीय आहे. “काही एएए गेम्स असतात आणि काही एएएए गेम्स असतात आणि माझा दावा आहे की ग्रँड थेप्ट ऑटो हा संभाव्यता एएएए गेम आहे,” असे लोअरी यांनी IGN ला सांगितले. हा गेम २०२६ मध्ये रिलीज झाल्यानंतर जागतिक पातळीवर मनोरंजन विश्वात वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

GTA 6 हा गेम इतर AAA गेम्सपेक्षा वेगळा कसा आहे?

रिपोर्ट्सनुसार, जीटीए६ चे डेव्हलपमेंट बजेट हे १ अब्ज डॉलर्सच्या जवळपास असू शकते. ज्यामुळे आजवरच्या इतिहासात तयार करण्यात आलेला हा सर्वात महागडा गेम ठरू शकतो. या गेम्सच्या ट्रेलरमध्ये यावर करण्यात आलेला खर्च दिसून येत आहे. यामध्ये हायपर रिअॅलिस्टीक अॅनिमेशन्स आणि अत्याधुमिक तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे, जे एएए गेम्समध्ये क्वचितच पाहायला मिळते. तज्ज्ञांचा दावा आहे की हा गेम १० अब्ज डॉलर्सहून अधिकची कमाई करेल, ज्यापैकी ७.६ अब्ज डॉलर्सची कमाई ही रीलिज झाल्यापासून पहिल्या दोन महिन्यातच होणे अपेक्षित आहे.

लोवरी यांच्या वक्तव्यानंतर अशी शक्यता व्यक्त होत आहे की जीटीए ६ हा गेम त्याच्या मागेपुढे रिलीज होणाऱ्या इतर गेम्सना मागे टाकेल. लहान पब्लिशर्सनी आधीच स्पष्ट केले आहे की ते रॉकस्टारच्या लाँच विंडोदरम्यान त्यांचे गेम रिलीज करणे टाळतील.