ऑनर पॅड ९ (Honor Pad 9) टॅबलेट लवकरच भारतात लाँच होणार आहे. बार्सिलोना, स्पेन येथे झालेल्या मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये या टॅबलेटचे अधिकृतपणे अनावरण करण्यात आले. ऑनरने आता भारतात टॅबलेट लाँच करण्याची घोषणा केली आहे. टॅबलेटबरोबर ऑनर एक ब्लूटूथ कीबोर्डदेखील ग्राहकांना मोफत देणार आहे; जे यापूर्वी Xiaomi Pad 6, Pad 5 वर पाहिले होते. Honor-Htech कंपनीने अद्याप लाँचची तारीख जाहीर केलेली नाही. पण, ऑनर पॅड ९ चे फीचर्स कंपनीच्या एका प्रमुख अधिकाऱ्याने सांगितले आहेत. खरेदीदारांसाठी या टॅबलेटमध्ये (पॅड) काय खास आहे ते पाहूया.

HTech चे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक CP खंडेलवाल यांनी एक्स (ट्विटर) वर होनोर पॅड ९ बद्दल सांगत फ्री ब्लूटूथ कीबोर्ड देण्यात येईल असे नमूद केले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले, “भारत! HONOR Pad 9 लाँचची तयारी करा. मोफत ब्ल्यूटूथ कीबोर्ड, लाइटनिंग-फास्ट 120Hz रिफ्रेश रेट आणि आकर्षक 2.5K इमर्सिव्ह 12.1 इंच डिस्प्लेसह, HONOR Pad 9 तुमचा टेक अनुभव आणखीन खास करण्याच्या तयारीत आहे #कमिंग सून”; अशी कॅप्शन त्यांनी पोस्टला दिली आहे.

Worlds smallest escalator in Japan unic escalators video goes viral
जगातील सर्वात लहान एस्केलेटर कुठे आहे? भारतीय तरुणीचा VIDEO होतोय प्रचंड व्हायरल
Yamaha Aerox 155 Version S launch
Hero, Honda चे धाबे दणाणले, यामाहाची नवी स्कूटर देशात दाखल; चावी शिवाय होणार सुरू, ना चोरीचे टेन्शन, किंमत…
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Next gen Maruti Suzuki Dzire
मारुतीचा नाद करायचा नाय! देशात आणतेय ‘ही’ नवी हायब्रिड कार, कधी होणार भारतात दाखल?

हेही वाचा…सॅमसंगच्या Holi Sale ची घोषणा; स्मार्ट टीव्ही, एसी, वॉशिंग मशीन अन् ‘या’ प्रॉडक्ट्सवर मिळणार बंपर डिस्काउंट

पोस्ट नक्की बघा…

फीचर्स :

ऑनर पॅड ९ स्पेस शेडमध्ये भारतात पदार्पण करेल. ऑनर पॅड ९ (Honor Pad 9) १२.१ इंच २.५ के डिस्प्लेसह १२० एचझेड रिफ्रेश दर आणि ५०० नीट्स पीक ब्राइटनेससह जबरदस्त व्हिज्युअल ऑफर करतो. यामध्ये Qualcomm च्या Snapdragon 6 Gen 1 SoC द्वारे समर्थित असून यात ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज आहे; जे ८ जीबी vRAM ने वाढवण्यात आले आहे.

६.९६ मिमी थिक आणि ५५५ ग्रॅम वजनाचा हा स्लीक टॅबलेट मेटॅलिक फिनिश आहे. टॅबलेटमध्ये MagicOS 7.2 वर चालते आणि विस्तारित वापरासाठी ८,३०० एमएएच बॅटरी पॅक देते. याव्यतिरिक्त, Honor Pad 9 व्हॉइस एन्हांसमेंट तंत्रज्ञान आणि बॅग्राउंड आवाज कमी करण्यासह आठ स्पीकर्ससह ऑडिओ गुणवत्तेचे वचन देतो. भन्नाट फीचर्स, आकर्षक डिझाइनचा टॅबलेट घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक बेस्ट टॅबलेट ठरेल.