सध्या थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहण्यापेक्षा किंवा टीव्हीवर मालिका पाहण्यापेक्षा ओटीटीवरील कार्यक्रम पाहणे सर्वांना आवडते. ओटीटीवर बऱ्याच प्रकारचा कंटेन्ट उपलब्ध होतो. नेटफ्लिक्स, ॲमेझॉन हे लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत. पण या प्लॅटफॉर्म्सचे सब्सक्रीप्शन मिळवण्यासाठी पैसे खर्च करावे लागतात, त्यातच वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रीप्शनसाठी वेगवेगळे पैसे मोजावे लागतात यामुळे खिशावर ताण पडू शकतो. असे अधिकचे पैसे खर्च होऊ नयेत यासाठी एक पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे एअरटेलचे काही रिचार्ज प्लॅन्स. एअरटेलच्या काही रिचार्ज प्लॅन्सबरोबर नेटफ्लिक्स, ॲमेझॉनचे फ्री सब्सक्रीप्शन उपलब्ध होते. कोणते आहेत हे रिचार्ज प्लॅन्स जाणून घ्या.

एअरटेलचा ४९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये ७५ जीबी रोलओवर डेटा उपलब्ध होतो.
  • एअरटेल एक्स्ट्रीम ॲप्सचा ॲक्सेस, हॅन्डसेट प्रोटेक्शन अशा सुविधा उपलब्ध होतात.
  • यासह या प्लॅनमध्ये ॲमेझॉन, डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रीप्शन उपलब्ध होते.

एअरटेलचा ९९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये १०० जीबी रोलओवर डेटा उपलब्ध होतो.
  • एअरटेल एक्स्ट्रीम ॲप्सचा ॲक्सेस उपलब्ध होतो.
  • यासह या प्लॅनमध्ये ॲमेझॉन, डिज्नी प्लस हॉटस्टारचे फ्री सब्सक्रीप्शन उपलब्ध होते.
  • या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे या प्लॅनवर २ फ्री फॅमिली ॲड ऑन प्लॅन मिळतात.

आणखी वाचा : १००० जीबी डेटा मिळणारे बीएसएनएलचे ‘हे’ दोन प्लॅन्स आहेत सर्वात लोकप्रिय; जाणून घ्या किंमत

एअरटेलचा ११९९ रुपयांचा पोस्टपेड प्लॅन

  • या रिचार्ज प्लॅनवर अनलिमिटेड कॉलिंगसह दररोज १०० एसएमएस करण्याची सुविधा उपलब्ध होते.
  • यामध्ये १५० जीबी रोलओवर डेटा उपलब्ध होतो.
  • यासह या प्लॅनमध्ये ॲमेझॉन, डिज्नी प्लस हॉटस्टार आणि नेटफ्लिक्स या तिन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मचे फ्री सब्सक्रीप्शन उपलब्ध होते.