scorecardresearch

Whatsapp webची मदत न घेता वापरा व्हाट्सअ‍ॅप; डेस्कटॉपवर व्हिडीओ कॉल करण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

मेटाद्वारे व्हाट्सअ‍ॅपच्या डेस्कटॉपमध्ये हे नवे बदल करण्यात आले आहेत.

whatsapp desktop feature
व्हाट्सअ‍ॅप डेस्कटॉप फीचर (फोटो – संग्रहित)

Whatsapp video call on desktop: व्हाट्सअ‍ॅप हे सध्या सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अ‍ॅप आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येक जण याचा वापर करताना पाहायला मिळतात. करोना काळामध्ये याचा वापर वाढला. तेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी व्हाट्सअ‍ॅपची मदत घेत होते. ऑफिसची कामे या माध्यमाद्वारे पूर्ण केली जात होती. शासनाद्वारेही व्हाट्सअ‍ॅपचा वापर केला गेला. अगदी तेव्हापासून आत्तापर्यंत भारतात व्हाट्सअ‍ॅप ही लोकांची गरज बनला आहे. संदेशवहनासह पैसे पाठवण्याची सुविधाही यामध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांचा वाढता कल पाहून मेटा कंपनीद्वारे व्हाट्सअ‍ॅपमध्ये दर महिन्याला नवनवीन अपडेट्स करण्यात येतात.

बरेचसे लोक आजही व्हाट्सअ‍ॅपचा वापर कामांसाठी करत असतात. अशा वेळी ते व्हाट्सअ‍ॅप वेबच्या सहाय्याने डेस्कटॉपवर व्हाट्सअ‍ॅप सुरु करत असतात. डेस्कटॉपवर व्हाट्सअ‍ॅप आणि स्मार्टफोनमधील व्हाट्सअ‍ॅपमध्ये फार फरक आहे. व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉल ही सुविधा मोबाइल फोनच्या व्हाट्सअ‍ॅप व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. कंप्यूटर किंवा लॅपटॉपवर व्हाट्सअ‍ॅप वेबच्या मदतीने काम करत असताना व्हिडीओ कॉलद्वारे मिटींग घ्यायची असल्यास इतर अ‍ॅप्सचा पर्याय निवडावा लागत असे. ही समस्या दूर करण्यासाठी मेटा कंपनीद्वारे WhatsApp Desktop App लॉन्च केले आहे. याच्या मदतीने तुम्ही कंप्यूटर/ लॅपटॉपवर व्हाट्सअ‍ॅपवरुन व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेला लाभ घेऊ शकता.

आणखी वाचा – WhatsApp च्या युजर्ससाठी ‘हे’ जबरदस्त फिचर लॉन्च, फोनची बॅटरी संपली तरी करता येणार व्हिडिओ कॉल

कंप्यूटर/ लॅपटॉपवर व्हाट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉल करण्यासाठीच्या स्टेप्स –

सर्वप्रथम गुगलवर जाऊन ‘Whatsapp app download’ असे टाइप करा.
त्यानंतर होमपेजच्या रिझल्ट्समध्ये पहिल्या लिंकवर क्लिक करा.
आता तुम्ही व्हाट्सअ‍ॅपच्या वेबसाइटवर पोहोचाल. यात डाव्या बाजूला ‘Download’ असे लिहिलेले दिसेल.
त्यावर क्लिक केल्याने तुमच्या कंप्यूटर/ लॅपटॉपवर WhatsApp Desktop App इन्स्टॉल होईल.
पुढे हे अ‍ॅप उघडावे आणि व्हाट्सअ‍ॅप वेबप्रमाणे मोबाइल कनेक्ट करावा.
असे केल्यानंतर तुम्हाला चॅटमध्ये व्हॉइस कॉल आणि व्हिडीओ कॉलसाठीचे ऑप्शन दिसेल.

(टीप – ही सुविधा व्हाट्सअ‍ॅप वेबवर उपलब्ध नाही आहे. तसेच विंडोज १० असलेल्या कंप्यूटर/ लॅपटॉपमध्येच या सुविधेचा वापर करता येतो.)

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 16:58 IST

संबंधित बातम्या