फोन हा आपल्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. फोनशिवाय माणूस जगू शकत नाही त्यामुळे फोनमध्ये थोडा जरी बिघाड झाला तरी अनेक समस्या निर्माण होतात. प्रत्येक जण आपल्या फोनची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न करतो पण अनेकदा चार्जिंग केबल खराब झाल्याने फोन चार्जिंग करताना अडचण निर्माण होते. तुमच्या फोनची चार्जिंग केबलही लवकर खराब होते का? मग या काही सोप्या ट्रिक्स तुम्ही फॉलो करू शकता.

१. चार्जिंग केबलचा वापर नीट करा. चार्जिंग केबल ही जास्त वाकवू नये किंवा खूप घट्ट गुंडाळणे टाळा. यामुळे चार्जिंग केबलवर ताण पडतो आणि केबल खराब होते

हेही वाचा : फोन पाण्यात पडल्यानंतर टेन्शन घेऊ नका, फक्त ‘या’ सोप्या स्टेप्स फॉलो करा

२. चार्जिंग करताना फोनचा वापर करणे, टाळा. अनेक युजर्स चार्जिंग सुरू असताना फोनचा वापर करतात यामुळे चार्जिंग केबल खराब होण्याची शक्यता अधिक असते.

३. अनेक जण चार्जिंग केल्यानंतर केबल स्विच बोर्डला लावून ठेवतात, असे करू नये. केबल ही एका पॉकेट किंवा बॅगमध्ये ठेवा. यामुळे चार्जिंग केबल सुरक्षित राहणार.

४. पॉवर बँकवर फोन चार्जिंग करताना नेहमी शॉर्ट केबलचा वापर करा. लहान चार्जिंग केबल वापरायला सोयीस्कर असते.

हेही वाचा : आता भारतात Facebook आणि Instagram वर मिळेल ब्लू टिक; इतके पैसे मोजावे लागणार

५. कधीही स्विचवरून चार्जिंग केबल ही ॲडाप्टरसह काढा. चुकूनही फक्त केबल काढू नका पण बॅगमध्ये ठेवताना ॲडाप्टर आणि केबल वेगवेगळे ठेवा.

६. चार्जरला पाण्यापासून दूर ठेवा. ओला असलेल्या चार्जरनी कधीही फोन चार्जिंग करू नका. चार्जर नेहमी कोरडा ठेवा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. चार्जिंग केबल खराब होऊ नये म्हणून केबलभोवती दोरी बांधा. यामुळे केबल अधिक सुरक्षित राहते.