करोना संकट असल्याने अनेक देशात शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्कूल फ्रॉम होममुळे मुलांना ऑनलाइन शिक्षणाची सवय लागली आहे. मात्र लवकरच करोना संकट ओसरून शाळा सुरु होतील, अशी आशा आहे. तत्पूर्वी शाळेतील मुलांसाठी Huawei ने एक स्कूलबॅग तयार केली आहे. या बॅगमध्ये अत्याधुनिक फिचर्स असून पालकांनाही मदत होणार आहे. कंपनीने Huawei 9um स्मार्ट पोझिशनिंग चिल्ड्रन्स स्कूलबॅग नावाचे उत्पादन सादर केले आहे. लवकरच ही बॅग बाजारात उपलब्ध होणार आहे. ही सामान्य बॅग नसून सुरक्षेच्या दृष्टीने यात बरेच फिचर्स आहेत.

शाळांमध्ये स्मार्टफोन आणि जीपीएस पॅकिंग स्मार्टवॉट नेण्याची परवानगी नाही. या बॅगेमुळे आपला मुलगा कुठे आहे? याबाबतची माहिती पालकांना मिळणार आहे. स्कूलबॅग अ‍ॅप कंट्रोल आणि HarmonyOS Connect सपोर्टसह येते. स्कूलबॅग मोबाईल फोनवर “स्मार्ट लाइफ” अ‍ॅपशी यशस्वीरित्या कनेक्ट झाल्यानंतर, तीन ठिकाणं सेट केली जाऊ शकतात. उदाहरणार्थ घर/शाळा/इतर अशी ठिकाणं सेट करता येतील. जेव्हा मुलाचे बॅकपॅक सेट केलेल्या भागात प्रवेश करेल किंवा बाहेर पडेल, तेव्हा पालकांना एक संदेश प्राप्त होऊ शकतो. जसे की विद्यार्थी शाळेत प्रवेश करतो, त्याच वेळी पालक त्यांच्या मोबाइल फोनवर त्यांच्या मुलाचे स्थान तपासू शकतात. रिअल-टाइममध्ये मुलाच्या स्थानाची माहिती जाणून घेण्यासाठी उच्च-फ्रिक्वेंसी मोड दर दोन मिनिटांनी एका निश्चित ठिकाणावर चेक इन करेल. तसेच या ट्रॅकची माहिती तीन महिन्यांपर्यंत राखून ठेवली जाऊ शकते. एर्गोनॉमिक्सच्या दृष्टीने, 9um स्मार्ट पोझिशनिंग चिल्ड्रन स्कूलबॅगमध्ये वजनाचा देखील विचार करण्यात आला आहे. खास U-आकाराचा पट्टा डिझाइन केला आहे. पट्टा मुलाच्या खांद्यावर आणि मानेला सुलभतेने बसतो. बॅगचं फॅब्रिक मऊ असल्याने वाहून नेण्यास अधिक आरामदायक बनते. याशिवाय स्कूलबॅगचं डिझाइन सर्वसाधारण स्कूलबॅगच्या उंचीपेक्षा सुमारे ६ ते ७ सेमीने कमी आहे. कंबरेला त्रास होऊ नये असं त्याचं डिझाइन करण्यात आलं आहे. १३५ सेमीपेक्षा कमी उंचीच्या मुलांसाठी अधिक योग्य आहे.

master of human capital management and employee relations affiliated to mumbai and nagpur university
शिक्षणाची संधी : एचआर’मधील संधी
WAPCOS Engineer Recruitment or Bharti For 275 Various Posts Check selection process and important details
WAPCOS Recruitment 2024: इंजिनियर्ससाठी नोकरीची संधी! ‘या’ विविध पदांसाठी भरती सुरू; ‘असा’ करा अर्ज
Pune model of co-working space From start-ups to large companies everyone is getting preference
को- वर्किंग स्पेसचे पुणेरी मॉडेल! स्टार्टअपपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांचीच मिळतेय पसंती
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

‘हे’ Chrome, Microsoft Edge अपडेट डाउनलोड करू नका, तुम्ही अडचणीत येऊ शकता

नवीन बॅगमधील सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे १.५४ इंचाचा IP67 डस्टप्रूफ आणि वॉटरप्रूफ फन स्क्रीन डिस्प्ले. यात वर्गाचे वेळापत्रक, इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी, थीम घड्याळे इ. सेट करू शकतो. पालक मोबाइल अ‍ॅपवरून सर्व वर्ग वेळापत्रके मिळवू शकतात. पुढील दिवसाचे वेळापत्रक देखील दररोज स्वयंचलितपणे अद्यतनित केले जाऊ शकते. यामुळे मुलाला किंवा पालकांना पुढील दिवशी आवश्यक असलेली पुस्तके निवडणे सोपे होईल. या बॅगची किंमत आणि बाजारात कधी उपलब्ध होईल, याबाबत कंपनीने कोणताही खुलासा केलेला नाही.