इंटरनेटमुळे आपले आयुष्य अधिक सोपे झाले आहे. आपण घरबसल्या इंटरनेटच्या मदतीने कोणतेही काम करू शकतो. बँकेचे व्यवहार, वेगवेगळी बिल्स भरणे, अगदी महिन्याचे राशन देखील आपण मोबाईलमधून इंटरनेटच्या मदतीने मागवतो. त्यामुळे इंटेरनेटशिवाय कोणतेही काम करणे आजकाल अशक्य वाटते. अशात रिचार्ज प्लॅनवर उपलब्ध असणारा डेटा सांभाळून वापरावा लागतो. प्रत्येकवेळी डेटा संपणार तर नाही ना याची काळजी वाटते.

कधीकधी महत्वाचे काम करत असताना डेटा संपतो, अशावेळी काय करायचे हा प्रश्न उभा राहतो. यासाठी तुमच्या फोनमध्येच पर्याय उपलब्ध आहे, पण तो बऱ्याच जणांना माहित नसतो. काय आहे हा पर्याय आणि डेटा मिळवण्यासाठी कसा वापरता येईल जाणून घेऊया.

Vote From Home Eligibility and Procedure for Lok Sabha Election 2024 in Marathi
Vote From Home: घरबसल्या मतदान करण्यासाठी कोण पात्र? त्यासाठीचा फॉर्म 12D नेमका कसा भरायचा? जाणून घ्या
How To Save Electricity Bill Through Cooler
उन्हाळ्यात कुलरमुळे येणारं वीज बिल कमी करण्यासाठी कमाल जुगाड; प्लास्टिकच्या बाटलीचा ‘असा’ वापर करुन पाहा अन् पैसे वाचवा
diy homemade natural chemical free floor cleaner recipe for a Healthier Home
फक्त २० रुपयांत घरच्या घरी तयार करा फ्लोअर क्लिनर; वापरताच आरश्यासारखी चमकेल फरशी
how to make Pooris Without Rolling Pin
लाटणं न वापरता झटपट बनवा टम्म फुगणारी गोल पुरी! वेळ वाचवण्याचा देशी जुगाड, पाहा Viral Video

आणखी वाचा : मोबाईल हरवला तर? फोन ट्रॅक करण्याची सोप्पी पद्धत जाणून घ्या

फ्री इंटरनेट वापरण्याचा पर्याय

फेसबूकमध्ये फ्री वायफाय सर्व्हिस हा पर्याय आहे, ज्याद्वारे फ्री इंटरनेट वापरता येते. फेसबूकच्या मते लोकल बिझनेस करणाऱ्यांकडे जो वायफाय असतो, तो फेसबूककडुन व्हेरीफाय केलेला असतो. तो वायफाय कोणीही वापरू शकते. बहुतांश वेळा या वायफायला पासवर्ड नसतो. फेसबूककडे वायफाय फाउंडर नेटवर्क असते, जिथुन फ्री इंटरनेट वापरता येते. हे फीचर फेसबूकमध्ये लपलेले असते, याला सीक्रेट टूल म्हणता येऊ शकते.

या स्टेप्स वापरून मिळवा फ्री इंटरनेट

  • सर्वात आधी फेसबूक ॲप उघडा आणि त्यात मेन्यू (तीन आडव्या रेषा असणारे चिन्ह) पर्यायामध्ये जा.
  • त्यात सेटिंग्स अँड प्रायवसी पर्यायावर क्लिक करा. तिथे फाईन्ड वायफाय पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर फेसबुक तुम्हाला जवळपास उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉटची माहिती देईल. त्याबरोबर नकाशा आणि लोकेशन या दोन्हींची माहिती स्पष्टपणे देण्यात येईल.
  • सी मोर पर्याय निवडल्यास वायफायबद्दल अधिक माहिती उपलब्ध होईल.
  • ऑपशनवर क्लिक केल्यावर वायफाय पर्यंत जाण्याचा रस्ता दाखवला जाईल.
  • काही ठिकाणी फ्री वायफाय उपलब्ध नसल्यास त्यसाठी पैसे भरावे लागतील.

आणखी वाचा : फक्त ४२ रुपयांमध्ये डेटासह कॉलिंगची सुविधा! बीएसएनएलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन जाणून घ्या

अनेक कंपन्या देतात फ्री डेटा
अनेक टेलिकॉम कंपन्या फ्री डेटाही देतात. त्यासाठी टेलिकॉम कंपनीच्या अधिकृत अॅपवरून रिचार्ज करावा लागतो. एअरटेल ३५९ रुपयांवरील सर्व रिचार्जवर १ जीबी डेटासह २ कूपन देते. तर ४७९ रुपयांच्या रिचार्जवर कंपनी १जीबी डेटासह ४ कूपन देते. जिओ आणि वोडाफोन, आयडियाकडेही अशा अनेक ऑफर्स आहेत.