भारतात रेशन कार्डचा वापर फक्त रेशन घेण्यासाठीच नाही तर इतर अनेक कारणांसाठी केला जातो. रेशन कार्डद्वारे तुम्ही बँक खातं उघडण्यापासून इतर अनेक गोष्टी करू शकता. कोविड-19 महामारीच्या काळापासून गरीब कुटुंबांना रेशन कार्डवर मोफत रेशन दिलं जात आहे. त्यामुळे लाभार्थी महिन्यातून दोनदा रेशनचा लाभ घेत आहेत, एकदा केंद्राकडून तर दुसऱ्यांदा राज्य सरकारकडून मोफत रेशन दिले जात आहे.

रेशन कार्डचे अनेक नियम आहेत, अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या नियमाची माहिती नसेल तर तुम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं. बिहारमधील नागरनौसा येथील गोराईपूर बलबा गावात रेशन कार्डशी संबंधित असंच एक प्रकरण समोर आलं आहे. या प्रकरणात दुसऱ्याच्या रेशनकार्डवर दुसरंच कुणी बनावट पद्धतीने रेशनचा लाभ घेत होता. याबाबत प्रादेशिक डीएसओ प्रमोद कुमार म्हणाले की, बनावट पद्धतीने रेशन घेणाऱ्या अशा शिधापत्रिका विभागीय आयुक्त रद्द करू शकतात. याशिवाय अन्नधान्याचे पैसेही परत घेतले जातील.

आणखी वाचा : ‘हे’ Chrome, Microsoft Edge अपडेट डाउनलोड करू नका, तुम्ही अडचणीत येऊ शकता

४ महिने रेशन घेतले नाही तरी कार्ड रद्द होतात
हा नियम दिल्लीसह संपूर्ण देशात लागू आहे की, जर कार्डधारक तीन किंवा चार महिन्यांपासून रेशनचा लाभ घेत नसेल तर त्याचे कार्ड रद्द केले जाते. कारण असं मानलं जातं की या व्यक्तीला कोणत्याही शिधापत्रिकेची गरज नाही, ही व्यक्ती निम्न श्रेणीतील आहे.

आणखी वाचा : Amazon वर सुरू होतोय Great Republic Day Sale! स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही आणि इतर वस्तूंवर बंपर ऑफर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

४ लाख शिधापत्रिका रद्द होणार आहेत
झारखंड सरकारने चार लाख शिधापत्रिकाधारकांची ओळख पटवली आहे ज्यांनी अनेक महिन्यांपासून रेशन घेतले नाही. यासोबतच अशा लोकांचाही समावेश आहे, जे २०० क्विंटल धान विकून रेशनचा लाभही घेत आहेत. अशा कार्डधारकांची शिधापत्रिका रद्द करण्याची मोहीम सरकारने सुरू केली आहे. आतापर्यंत १ लाख लोकांची शिधापत्रिका रद्द करण्यात आली आहेत.