आजकाल प्रत्येकाच्या हातात सतत एक गोष्ट असते, ती म्हणजे मोबाईल. मनोरंजनापासून बँकेच्या मोठ्या व्यवहारांपर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी आपण मोबाईलवर अवलंबुन असतो. याबरोबरच मोबाईलचा अतिवापर होण्याचे आणखी एक कारण म्हणजे ऑनलाईन गेम्स. पण फोनवर सतत ऑनलाईन गेम्स खेळल्याने फोन गरम होत असल्याचे जाणवते. फोन जर अति गरम झाला तर ब्लास्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळे याबाबत काळजी घेणे आवश्यक असते.

स्मार्टफोनमध्ये सतत गेम खेळल्याने २० ते ३० मिनिटांनी फोन गरम होतो. एलेक्ट्रॉनिक डिव्हाईस गरम होणे ही सामान्य गोष्ट मानली जाते. पण जर असे डिव्हाईस अति गरम झाले तर त्याची बॅटरी फुटू शकते. यावर काय उपाय करता येईल जाणून घ्या.

Smartphone Hack : फक्त ५० रुपयांमध्ये करा तुमचा फोन वॉटरप्रूफ; काय आहे ‘ही’ ट्रिक जाणून घ्या

मोबाईल रेडीएटर

  • फोन सतत गरम होण्यापासून थांबवण्यासाठी तुम्ही ‘लाईमशॉट पबजी अँड फ्री फायर मोबाईल रेडीएटर’ (Limeshot Pubg and Free Fire Mobile Radiator) हे उपकरण विकत घेऊ शकता.
  • तुम्ही इतर कोणत्याही कंपनीचा रेडीएटर विकत घेऊ शकता पण लाईमशॉट ही उत्तम कंपनी मानली जाते, तसेच याचे फीचर्स देखील इतर कंपन्यांपेक्षा चांगले आहेत.
  • याची किंमत ३९९ रुपये आहे.
  • जर तुम्ही सतत गेम खेळत नसाल, पण चित्रपट किंवा वेब सिरीज पाहण्यासाठी सतत फोन वापरत असाल तरीदेखील तुम्ही हे रेडीएटर वापरू शकता.
  • फक्त १० सेकंदामध्ये हे डिव्हाईस फोनचे तापमान ७ टक्यांपर्यंत कमी करू शकते.
  • वायर असणारे की वायरलेस कोणते रेडीएटर घ्यायचे हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो.
  • जर तुम्ही गेमर असाल तर तुम्ही वायर असणारे रेडीएटर निवडावे. कारण वायरलेस रेडीएटरला सतत चार्ज करावे लागते.
  • जर तुम्ही फोन सतत वापरत नसाल तर् वायरलेस रेडीएटर निवडू शकता.