व्हाट्सअ‍ॅप हे लोकांशी संवाद साधण्याचे एक साधन आहे. यात आपण एकमेकांशी बोलू शकतो. व्हिडिओ कॉल् करणे, आपला फोटो किंवा अन्य गोष्टी पोस्ट करणे (स्टेट्स ठेवणे) यासारख्या बऱ्याच गोष्टी या अ‍ॅपच्या माध्यमातून करता येतात. व्हाट्सअ‍ॅप हे एक इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असून,ते नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स लाँच करत असते. सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीने गेल्या वर्षी अनेक नवीन फीचर्स लाँच केले होते. २०२२ मध्ये कम्युनिटी फिचर, प्रोफाइल फोटो पाहणे हे युजर्सचे मुख्य आकर्षण होते. आता सुद्धा व्हाट्सअ‍ॅप युजर्ससाठी व्हॉइस, व्हिडीओ आणि मेसेज यासंबंधित नवीन फीचर्स लाँच करण्याची शकता आहे. आता आपण ती फीचर्स कोणती असतील ते पाहुयात.

कॉल टॅब

मेटाच्या मालकीचे असलेले व्हाट्सअ‍ॅप हे अ‍ॅप डेस्कटॉपवर कॉल टॅब हे फीचर्स आणू शकते. युजर्स मोबाईल आणि वेब अ‍ॅप्लिकेशन्ससह व्हाट्सअ‍ॅप कॉल्सचा डेटा ट्रॅक करू शकतात.

हेही वाचा : One plus चा नवीन स्मार्टफोन होणार लाँच; ‘हे’ असतील हटके फीचर्स

टेक्स्ट सुरक्षित राहणार

हे फीचर व्ह्यू -वन्स या फिचर सारखेच असेल. टेक्स्ट या फीचरमुळे व्ह्यू रोल आऊट होईल. हे फिचर युजर्सचे मेसेजेस खासगी आणि सुरक्षित ठेवण्यास मदत करेल. सध्या हे फीचरवर काम सुरु असून, लवकरच ते beta testers साठी रिलीज केले जाऊ शकते.

व्हिडिओ कॉलवेळी अनेक अ‍ॅप्लिकेशन वापरता येणार

या फीचरमुळे युजर्स व्हाट्सअ‍ॅप कॉलवर राहून इतर अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करू शकतात. हे फिचर व्हिडीओ कॉलची विंडो लहान करेल आणि युजर्सना इतर अ‍ॅप्लिकेशन्सचा वापर करता येईल. हे फिचर अँड्रॉइड युजर्ससाठी आधीपासून असून आता लवकरच ते iOS युजर्ससाठी लाँच केले जाईल.

हेही वाचा : Apple ची 15वी सिरीज टायटॅनियम फ्रेम असणार? जाणून घ्या आणखी काय असतील फीचर्स

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हाट्सअ‍ॅप एकाचवेळी अनेक ठिकाणी वापरता येणार

सध्या युजर्सना व्हाट्सअ‍ॅपमध्ये एकावेळी दोन सर्व्हिसेस किंवा मल्टिपल डिव्हाइसेसवर एकच अकाउंट वापरता येत नाही. मात्र या फीचरमुळे युजर्सना त्यांचा डेटा लिंक आणि करण्याचा ऑप्शन मिळेल. अनेक डिव्हाइसवर सेम प्रोफाइल व्हाट्सअ‍ॅप वापरता येईल. हे एकाच वेळी अँड्रॉइड आणि iOS वर युजर्सना वापरता येईल.